Join us

सत्तेत सामील होणारे अजित पवार चौथे विरोधी पक्षनेते ठरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 6:27 AM

आजचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते होते.

मुंबई : अजित पवार हे अलीकडील वर्षांत विरोधी पक्षनेते असताना सत्तेत सहभागी झालेले चौथे विरोधी पक्षनेते ठरले आहेत. याआधी नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत असेच घडले होते. २०१४ मध्ये भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली. त्यावेळी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेता केले. नंतर शिंदे हे कॅबिनेट मंत्री झाले होते.  

आजचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते होते. त्यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपकडून अहमदनगरमध्ये लोकसभेची निवडणूक लढली व ते जिंकले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काहीच महिने आधी राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये गेले आणि गृहनिर्माण मंत्रीही झाले. २०१९ मध्ये ते भाजपकडून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या वर्षी झालेल्या सत्तांतरात त्यांना महसूल हे महत्त्वाचे खाते दिले गेले. नारायण राणे शिवसेनेत असताना विरोधी पक्षनेते होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले. 

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्र सरकार