Join us

अजितदादांना मिळाला 'फेव्हरेट' बंगला, आदित्य ठाकरेंचं घर 'वर्षा'पासून दूर, पण मंत्रालयाजवळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 12:31 PM

शासनाने आज परिपत्रक काढून नव्या ३६ कॅबिनेट अन् राज्यमंत्र्यांना बंगल्याचं वाटप केलं आहे.

मुंबई - राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज नव्या मंत्र्यांना शासनाकडून राहण्यासाठी बंगले वाटप करण्यात आलं आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या पसंतीचा मलबार हिल येथील देवगिरी बंगला देण्यात आला आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव मंत्री आदित्य ठाकरेंनामंत्रालयासमोरील अ-६ बंगला देण्यात आला आहे. भाजपा शासनाच्या काळात अ-६ निवासस्थान तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले होते. 

शासनाने आज परिपत्रक काढून नव्या ३६ कॅबिनेट अन् राज्यमंत्र्यांना बंगल्याचं वाटप केलं आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे पाटील यांना शिवगिरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी, राजेंद्र शिंगणे यांना सातपुडा, राजेश टोपे यांना जेतवन अशाप्रकारे बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. 

बंगल्याचं वाटप पुढीलप्रमाणे 

  • नवाब मलिक - अ ५ 
  • हसन मुश्रीफ - ब ५ 
  • वर्षा गायकवाड - ब ४
  • जितेंद्र आव्हाड - ब १
  • सुनील केदार - ब ७
  • विजय वडेट्टीवार - अ ३
  • अमित देशमुख - अ ४ 
  • उदय सामंत - ब २
  • दादाजी भुसे - ब ३
  • संजय राठोड - क १ 
  • गुलाबराव पाटील - क ८ 
  • के. सी पाडवी - क ३
  • संदीपान भुमरे - क ४
  • बाळासाहेब पाटील - क ६
  • अनिल परब - क ५
  • अस्लम शेख - क २
  • यशोमती ठाकूर - ब ६
  • शंकरराव गडाख - सुरुची १६
  • धनंजय मुंडे - अ ९ 
  • आदित्य ठाकरे - अ ६ 
  • राज्यमंत्री अब्दुल सत्तार - सुरुची १५ 
  • सतेज पाटील - सुरुची ३ 
  • शंभुराज देसाई - यशोधन १२ 
  • बच्चू कडू - रॉकीहील टॉवर १२०२
  • दत्तात्रय भरणे - अवंती १ 
  • विश्वजीत कदम - निलांबरी ३०२
  • राजेंद्र यड्रावकर पाटील - सुरुची २ 
  • संजय बनसोडे - रॉकीहील टॉवर १२०३
  • प्राजक्त तनपुरे - निलांबरी ४०२
  • आदिती तटकरे - सुनिती १० 

तसेच यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचाही बंगला बदलण्यात आला आहे. त्यांना यापूर्वी अ ९ हा बंगला देण्यात आला होता. मात्र त्याऐवजी त्यांना अवंती ८ हा बंगला देण्यात आला आहे.  

टॅग्स :मंत्रालयअजित पवारआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेबच्चू कडूनवाब मलिकधनंजय मुंडे