Join us

अजित पवार गटाचे आमदार अपात्र नाही, पण शरद पवार गटाचे काय झाले?; नार्वेकरांचा महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 5:15 PM

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला.

NCP ( Marathi News ) : मुंबई-  राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. सुरुवातील राष्ट्रवादी पक्ष मुळ अजित पवार यांचा असल्याचा निर्णय दिला. यानंतर अजित पवार गटातील ४१ आमदार पात्र  असल्याचे निर्णयात सांगितले. तसेच शरद पवार गटाचेही आमदार अपात्र नसल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. 

निकालात काय सांगितले?

शिवसेनेची केस आणि कोर्टाने घालून दिलेले नियम पाहिले. १० व्या सुचीनुसार कारवाई होऊ शकते का? हे पाहणं महत्वाचे आहे. निर्णय देण्याआधी पक्ष कुणाचा हे ठरवणे महत्वाचे आहे.

पक्षातील कार्यकारणी सर्वात महत्वाची आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व समित्यांची बाजू समजून घेतल्या. कार्यकारणी आणि अध्यक्षांचे अधिकार लक्षात घेतले. दोन्ही गटांना म्हणणं मांडण्याची संधी दिली. ३० जून २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. नेतृत्व रचनेसाठी पक्षघटना लक्षात घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. ३० जून २०२३ ला या पक्षात फूट पडली. अश्यावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचे आहे. मी माझे मत मांडण्यास सुरुवात करत आहे. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र ते गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणी हीच सार्वभौम आहे.  

शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत.  अजित पवार गटाला शरद पवार गटापेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे अजित पवार यांचा मुळ राष्ट्रवादी पक्ष आहे, असंही अध्यक्ष म्हणाले. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारअजित पवारराहुल नार्वेकर