Join us

Maharashtra Politics : अजित पवारांचा खुलासा...! मी मुंबईतच, आमदारांच्या बैठकीच्या बातम्या पूर्णत: असत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 7:19 PM

Maharashtra Politics : या चर्चांवर आता अजित पवार यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे. 

Maharashtra Politics : मुंबई- गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार काही आमदारांसह भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आज अचानक अजित पवार यांनी पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पवर राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.या चर्चांवर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे. 

"खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो, असं ट्विटमध्ये अजित पवार यांनी म्हटले आहे. 

"सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार असल्याचेही पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. 

"मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन दिले आहे.  (Maharashtra Politics )

चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

आज अजित पवार यांचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. 

कर्नाटकात भाजपला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश; पक्ष गळती सुरु?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपमध्ये बुथमध्ये काम करणाऱ्यांचा आम्ही पक्ष प्रवेश करुन घेत आहे. ज्यांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा स्विकारली तर कोणाचही आम्ही पक्षात स्वागत करतो. आमच्याकडे पक्षाच्या विचारधारेवर काम करावे लागते. आमच्या पक्षाच्या विचारधारेवर काम करावे लागते. त्यामुळे कोणीही आमच्या पक्षात येऊन विचारधारेवर सहमत झाले तर आमची काही अडचण नाही, असंही बावनकुळे म्हणाले. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा