मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत.
शालिनीताई पाटील म्हणाल्या, शरद पवार यांनी केलेलं बंड हे वेगळ बंड होतं, आणि अजित पवारांनी केलेलं बंड वेगळे आहे. तुम्ही शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तो परत घेतला म्हणून भाजपसोबत गेलो म्हणून सांगत आहात. तुम्ही पक्ष घेऊन न जाता सरळ एकटे बाहेर पडा आणि निवडून येऊन दाखवा. अजित पवार राष्ट्रवादी सरकारमध्ये होते तेव्हा कित्येक वर्ष उपमुख्यमंत्री होता. भाजपचीच लोक छगन भुजबळ दोन वर्षे तुरुंगात का होते असं विचारतील, आज ना उद्या हे विचारतील. अजित पवारांचीही चौकशी सुरू आहे, कोर्टाने त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करायला सांगितलं आहे. आम्ही २०१९ साली एफआयआर दाखल केला तेव्हा ते अचानक चार दिवस गायब झाले, तेव्हा शरद पवार मुंबईला गेले आणि त्यांनी त्यांना समन्स आलाय असं दाखवलं यामुळे त्यांच्या दारात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांना आश्रय दिला.
जातीय विखार... 'सटरफटर' म्हणणाऱ्या नीलम गोऱ्हेंना सुषमा अंधारेंचं सडेतोड पत्र
" कोर्टाने ठेवलेल्या आरोपांना आज ना उद्या तु्म्हाला तोंड द्यावे लागणार आहेत. काकांचा आश्रय तुम्हाला कमी पडला म्हणून तुम्ही भाजपच्या आश्रयला गेले आहेत. पाच वर्ष जर सरकारने चार्जशीट ठेवले नाहीत तर कोर्ट फाईल बंद करते, तसं इरिगेशनच्या फाईलचे झाले आहे, आज ना उद्या शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या चौकशीला सामोरे जावे लागेल. यातील मुख्य आरोपी अजित पवार आहेत. २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे, असंही शालिनीताई पाटील म्हणाल्या.
'आज ना उद्या हे सगळे घोटाळे समोर येणार आहेत. जरंडेश्वर कारखान्याचाही विषय आहे. तीन कोटींचा हप्ता चुकला म्हणून तो कारखाना विकला, ज्या कंपनीने तो कारखाना घेतला त्या कंपनीचे नाव आम्ही पहिल्यांदाच ऐकले. कारखान्याची बोली ६५ कोटी रुपये त्यांनी लावली. त्यांना पुणे जिल्हा बँकेने कर्ज दिलं, हा व्यवहार सगळा गुंतागुंतीचा आहे. आज ना उद्या त्यांना तुरुंगात जावे लागणार आहे. तेव्हा आमचा कारखाना सुरू होता. शिखर बँकेचा तीन कोटींचा हप्ता फक्त तटला होता, असंही शालिनीताई पाटील म्हणाल्या.
'शरद पवार यांनी जरी वसंतदादा पाटील यांच्याविरोधात जरी बंड केलं असलं तरी त्याला पक्षातील काही कारणे होती. पण, तरीही वसंतदादा पाटील राज्यपाल म्हणून जयपूर येथे जाणार होते तेव्हा त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करा असं आम्हाला सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही लोक कोण आहेत कळत नाही का? का ती असले लोक सरकारमध्ये घेत आहेत, असा सवालही पाटील यांनी केला.