Join us  

"अजित दादा, उद्धव ठाकरेंना सांगतो, ही पाटलाची औलाद हाय, जातीवंत आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 5:51 PM

राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आता शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगला आहे

मुंबई/सोलापूर - राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान हालचाली घडताना दिसत आहेत. '१५ आमदार बाद होणार, अजित पवार भाजपासोबत जाणार' असे ट्विट अंजली दमानिया यांनी केल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह ५० खोक्यांचा आरोप करणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. शरद पवार हे ४५ वर्षे माझे पालक होते, पण त्यांच्याजवळ गेलेल्या छोट्या पक्षांना त्यांनीच संपवलं, असा आरोपही पाटील यांनी केला आहे.

राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आता शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगला आहे. तर, महाविकास आघाडीसह शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदे गटावर सातत्याने ५० खोक्के, एकदम ओक्के असे म्हणत टीका केली जाते. प्रत्येक सभेत गद्दार आणि ५० खोके म्हणत शिंदे गटाच्या आमदारांना लक्ष्य करण्यात येते. त्यामुळे, शिंदे गटाकडूनही पलटवार करण्यात येतो. आता, आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंसह, अजित पवार आणि ५० खोक्के म्हणून चिडवणाऱ्यांना आपण जातीवंत पाटील असल्याचं सांगितलंय. तुमच्या पुढच्या पिढीची सोय करायचीय म्हणून ते तुम्हालाच लखलाभ. 

ही पाटलाची औलाद आहे, जातीवंत आहे, पावणे दोनशे एअर जमीन अशी पत्रावळ्या फेकाव्या तशी मी सातबारे फेकली आहेत, ५० खोकं घेऊन कुठं बसतुय, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांनी ५० खोक्यांवरुन चिडवणाऱ्यांना फटकारलं आहे. तसेच, शहाजी पाटील ही कर्णाची औलाद आहे, घरात घेऊन जाणारा नव्हं. तुम्ही साचवून ठेवा नातवासाठी, तुमचं नासून जाणार. आमचा खळखळणारा झरा, आलं इकडं गेलं तिकडं, असे म्हणत आमदार शहाजी पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केलं.  

टॅग्स :अजित पवारशिवसेनाउद्धव ठाकरे