Join us

अजित पवारांची मोठी घोषणा; मुंबई पालिका निवडणूक शिवसेनेसोबत लढणार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 7:45 PM

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली जळत आहे. केंद्रात सत्तेत असलेला पक्ष दिल्ली जिंकू शकला नाही, पण सांप्रदायिक विचाराने समाजात तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा करून घेत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. 

ठळक मुद्देएकीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते. तर दुसरीकडे देशाची राजधानी जळत होती.दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केंद्राकडे असते.शिवभोजन थाळी आपण सुरु केली आहे. चुकीचे निर्णय आम्हाला वाटतात ते भाजपाला चांगले वाटतही असतील.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अभेद्य असून भाजपा ही भींत पाडण्याचे प्रयत्न करत आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज असू नयेत. कारण आम्ही येत्या काळातील निवडणुका एकत्र लढवणार आहोत, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरामध्ये आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अजित पवार यांनी पुढील निवडणुकांतही शिवसेनेसोबत आघाडी करणार असल्याचे सांगितले. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली जळत आहे. केंद्रात सत्तेत असलेला पक्ष दिल्ली जिंकू शकला नाही, पण सांप्रदायिक विचाराने समाजात तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा करून घेत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. यानंतर शरद पवार यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते. तर दुसरीकडे देशाची राजधानी जळत होती. राज्यकर्ते जर चुकीचे वागायला लागले, राज्यकर्तेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतील तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केंद्राकडे असते. त्यामुळे दिल्लीत जे घडले त्याची पूर्ण जबाबदारी ही केंद्राची आहे, असा आरोप पवार यांनी केला. 

मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेनाच पहिला पक्ष राहणार आहे. मात्र, राष्ट्रवादीही यावेळी दुसरा मोठा पक्ष बनण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं रणशिंग अजित पवार यांनी फुंकलं.  

'ये दिवार तुटती क्यूँ नही, अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार' मनासारखे होत नसल्यानेच दिल्लीत हिंसाचार घडवला; शरद पवारांचा भाजपावर आरोपसरकार सत्तेत आल्यावर पहिल्यांदा शिबीर आयोजित करण्यात आले आहे, त्याबद्दल मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अजितदादा पवार यांनी यावेळी अभिनंदन केले. आपले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दोन महिने झाले शपथ घेऊन. शाळांमध्ये मराठी विषय घेण्यात यावा असा कायदा केला आहे. शिवभोजन थाळी आपण सुरु केली आहे. चुकीचे निर्णय आम्हाला वाटतात ते भाजपाला चांगले वाटतही असतील. ते निर्णय आम्ही जनतेला फायदा होतो की नुकसान होते हे पाहून बदलले आहेत. आमच्या सरकारने कुठलीही विकास कामे थांबवली नाहीत. ज्या कामांच्या बाबतीत शंका येते. म्हणजे समाजाच्या भल्यासाठी जी विकासकामे नाहीत हे लक्षात आल्यावर अशी कामे थांबवली, असेही पवार म्हणाले.

 

टॅग्स :शरद पवारअजित पवारशिवसेनामुंबई महानगरपालिकानिवडणूकमहाराष्ट्र विकास आघाडी