मुंबई- शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये निधी वाटपावरुन नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार गटातील काही आमदारांनी निधी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केले असल्याचे बोलले जात आहे. यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नामदेव जाधवांचा 'त्या' घराण्यांशी संबंध नाही; रोहित पवारांनी दिला पुरावा
आमदार सचिन अहिर म्हणाले, आमचे सहकारी आमच्यासोबत असताना जे टीका करत होते, आरोप करत होते. मोठ्या मनाने त्यांनी गेलेल्यांचा स्विकार केला. आज ही वस्तुस्थिती त्यांच्या नजरेत आलेली आहे, निधीचा वाटप हा समान होणार नाही. आगे आगे देखीये होता है क्या, असा सूचक इशारा यावेळी आमदार अहिर यांनी दिला.
"भाजपच्या ज्या १०५ आमदारांना बोलता येत नाही. त्यांच्या मनात काय वेदना होत आहेत. बरेचजण आमच्याकडे खासगीत येऊन बोलतात. निधीसाठी त्यांना मुख्यमंत्र्यांकडे जावे लागत आहे. आणि काल आलेले लोक एस्कॉर्टमध्ये फिरत आहे. लोकसभेनंतर काय होतंय बघुया, असंही आमदार सचिन अहिर म्हणाले. दोन दिवसांपूर्वी सिद्धीविनाय मंदिराचे त्यांनी पद भरले, ते भरावेच लागणार होते. बारा आमदारांचे अजुनही एकमत होत नाही. बारा आमदारांसाठी बावीस लोकांना शब्द दिला आहे, असा टोलाही अहिर यांनी लगावला.
आमदार सचिन अहिर पुढे म्हणाले, विरोधी पक्षातील नेत्याला धमकीचा फोन आला असेल तर सरकारला संरक्षण देण्याची जबाबदारी आहे. धमकी देणाऱ्याची चौकशी केली पाहिजे, असंही अहिर म्हणाले. अजित पवारांनी अमित शाहांच्या घेतलेल्या भेटीवर अहिर म्हणाले, आम्हाला लोकसभेनंतर काय धमाका होणार आहे हे पाहायचं आहे. अनेक आमच्यातून गेलेले खासदार भाजपचे चिन्ह घ्यायलाही तयार नाहीत. चिन्ह घेऊन आम्ही मतदारांसमोर जाऊ शकत नाही असं बोलत आहेत, असंही आमदार सचिन अहिर म्हणाले.