अजित सावंतांवर रिलायन्सचा १00 कोटींचा मानहानीचा दावा
By admin | Published: January 5, 2017 06:32 AM2017-01-05T06:32:20+5:302017-01-05T06:32:20+5:30
डिजिटल सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने, काँग्रेसचे माजी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अजित सावंत यांना मानहानीची नोटीस बजावली आहे.
मुंबई : डिजिटल सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने, काँग्रेसचे माजी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अजित सावंत यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये सावंत यांनी ‘कामगार न्याय प्रकरणी’ केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यासह मानहानी म्हणून १०० कोटी अदा करावेत, असे रिलायन्सने म्हटले आहे, तर अजित सावंत यांनी ही नोटीस म्हणजे, आवाज दाबवण्याचा प्रयत्न असून, कामगारांच्या शोषणाविरोधात आवाज उठवणारच, असे म्हटले आहे.
रिलायन्सच्या नोटीसनुसार, राजकीय नेते म्हणून परिचित असलेले सावंत यांनी सोशल नेटवर्क साइट्सचा आधार घेत, ‘कामगार न्याय प्रकरणी’ काही मेसेज अपलोड केले होते. सावंत यांनी अपलोड केलेल्या संदेशामुळे समाजमनात एकतर्फी संदेश गेला असून, कंपनीची मानहानी झाली आहे. परिणामी, संबंधितांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करावी. शिवाय झालेल्या मानहानीबाबत १०० कोटी अदा करावेत, असे रिलायन्सने म्हटले आहे. (प्रतिनिधी)