प्रवासी म्हणाला, "कोई भी जिंदा नहीं बचेगा..."; एअरपोर्टवर उडाली खळबळ अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 08:54 AM2024-10-29T08:54:34+5:302024-10-29T08:55:13+5:30
Akasa Air : येथे, एका व्यक्तीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एक उत्तराला धमकी देत, विमानाचे उड्डाण झाल्यास कुणीही प्रवासी जिवंत वाचणार नाही, असे म्हटले होते...
देशात सातत्याने बॉम्बने विमान उडवण्यच्या धमक्या येत आहेत. यातच आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवार (27 ऑक्टोबर) एक धक्कायदक घटना घडल्याचे वृत्त आहे. येथे, एका व्यक्तीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एक उत्तराला धमकी देत, विमानाचे उड्डाण झाल्यास कुणीही प्रवासी जिवंत वाचणार नाही, असे म्हटले होते. यानंतर, तपासणी केली असता संबंधित व्यक्ती खोटे बोलत असल्याचे उघड झाले. यामुळे विमान उड्डाणालाही उशीर झाला.
असं आहे संपूर्ण प्रकरण -
यासंदर्भात माहिती देनात पोलिसांनी सांगितले की, संबंधित आरोपीचे नाव मोहम्मद यूसुफ मलिक (52) असे आहे. आरोपी रविवारी सकाळी श्रीनगरला जाण्यासाठी अकासा एअरच्या फ्लाइट QP 1637 मध्ये बसण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचला. यावेळी त्याचे ब्लड प्रेशर अचानक वाढले आणि आता आपल्याला फ्लाइटमध्ये बसता येणार नाही असे त्याला जाणवले. यानंतर, तो बोर्डिंग गेटवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला धमकी देत म्हणाला, हे विमान उडायला नको, जर उडले तर कोणीही वाचणार नाही.
यासंदर्भात सुरक्षा कर्मचाऱ्यांना तातडीने वरिष्ठांना कळवले. यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र यात काहीही आढळून आले नाही. परिणामी विमान उड्डाणास ९० मिनिटे उशीर झाला.
'काळ्या जादूचा प्रभाव' -
यासंदर्भात CISF ने मोहम्मद यूसुफ मलिकची चौकशी केली असता, तो म्हणाला की, "आपण काळ्या जादूच्या प्रभावाखाली होतो. अधिकाऱ्यांनी त्याच्या बॅगचीही झडती घेतली, मात्र त्यात काही संशयास्पद आढळले नाही. यावेळी मलिकचा श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे बघून विमानतळावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. यावेळी त्याचे ब्लड प्रेशर वाढलेले असल्याचे निदर्शनास आले.
मलिक विरोधात पोलिसांनी
भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(4), 353(1)(बी) (लोकांमध्ये भीती किंवा चिंता निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली कृत्ये) आणि कलम 125 (मानवी जीवन किंवा सुरक्षितता धोक्यात आणणारी अविचारी कृत्ये) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.