Join us

अकासाचे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण दोहासाठी, २८ मार्चपासून सुरू होणार आंतरराष्ट्रीय मार्गावर प्रवास

By मनोज गडनीस | Published: February 16, 2024 5:49 PM

Airplane: गेल्या १९ महिन्यांपूर्वी देशात विमान सेवा सुरू केलेल्या अकासा विमान कंपनीने आता आंतरराष्ट्रीय उड्डाणाची तयारी सुरू केली असून येत्या २८ मार्चपासून कंपनीचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान दोहासाठी होणार आहे. मुंबई ते दोहा या मार्गावर आठवड्यातून चार वेळा नॉन-स्टॉप सेवा कंपनीतर्फे सुरू होणार आहे.

- मनोज गडनीसमुंबई - गेल्या १९ महिन्यांपूर्वी देशात विमान सेवा सुरू केलेल्या अकासा विमान कंपनीने आता आंतरराष्ट्रीय उड्डाणाची तयारी सुरू केली असून येत्या २८ मार्चपासून कंपनीचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान दोहासाठी होणार आहे. मुंबई ते दोहा या मार्गावर आठवड्यातून चार वेळा नॉन-स्टॉप सेवा कंपनीतर्फे सुरू होणार आहे. याकरिता, २९ हजार १० रुपयांचा दर सध्या निश्चित करण्यात आला आहे. 

अकासा कंपनीच्या ताफ्यात सध्या २० विमाने आहेत. तर, अलीकडे हैदराबाद येथे झालेल्या एअर-शो कार्यक्रमादरम्यान कंपनीने नव्या तब्बल १५० विमानांची ऑर्डर दिली आहे. या नव्या विमानांच्या खरेदीसाठी कंपनीने बोईंग कंपनीला प्राधान्य दिले असून बोईंग कंपनीची ७२७ मॅक्स या जातीची विमान खरेदी करण्याची घोषणा केली आहे. गेल्यावर्षी देखील कंपनीने काही विमानांची खरेदी केली होती. या नव्या १५० विमानांच्या खरेदीमुळे आगामी आठ वर्षांत कंपनीच्या ताफ्यातील विमानांची संख्या २२६ इतकी होणार आहे.

टॅग्स :विमान