मुंबई : चोरी, घरफोडी, जबरी चोरी, बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे एकूण ११ गुन्हे दाखल असलेला अकबर इद्रीस खान अटकेनंतर जामिनावर बाहेर पडला. तेव्हापासून तो न परतल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते. अखेर दहा महिन्यांनी त्याला गोरेगावमधून राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी अटक केली.भायखळा परिसरात बेकायदेशीररीत्या रिव्हॉल्व्हर तसेच काडतुसे बाळगल्याप्रकरणी १६ जानेवारी २०१४ रोजी शिवानंद पांडेला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीत त्याने हे रिव्हॉल्व्हर गोरेगावमध्ये राहणाºया खानकडून घेतल्याची माहिती समोर आली. खानलाही या गुन्ह्यात बेड्या ठोकून त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले होते. माझगाव न्यायालयात त्याच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. याचदरम्यान नोव्हेंबर २०१६मध्ये तो जामिनावर बाहेर आला. तेव्हापासूनच तो पसार झाला. यानंतर न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते.उपआयुक्त मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली खानचा शोध सुरू करण्यात आला असता तो परदेशात पसार झाल्याची माहिती समोर आली.
अकबर खानला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 1:24 AM