मच्छिमारांचा पालिका मुख्यालयावर धडक आक्रोश मोर्चा; मोर्चात मच्छिमार बांधव व महिला मोठ्या संख्यने सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 08:00 PM2021-08-25T20:00:40+5:302021-08-25T20:03:03+5:30
मच्छिमारांवर महागरपालिकेकडून सातत्याने होत असलेल्या अन्याचा विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने आयोजित जन आक्रोश मोर्चात मच्छिमार बांधव व महिला मोठ्या संख्यने सहभागी झाल्या होत्या.
मुंबई: मच्छिमारांवर महागरपालिकेकडून सातत्याने होत असलेल्या अन्याचा विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने आयोजित जन आक्रोश मोर्चात मच्छिमार बांधव व महिला मोठ्या संख्यने सहभागी झाल्या होत्या.
वेसावे कोळी वाड्यातून मच्छिमार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमच्या बसेस पोलिसांनी वेसावे सह अनेक ठिकाणी मोर्चाला येणाऱ्या बसेस आडवल्या तरी वेसाव्यासह ठिक ठिकाणांवरून मोठ्या संख्येने येथील तरुण कोळी बांधव व कोळी महिला या मोर्चात सहभागी झाल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे उपाध्यक्ष प्रदीप टपके यांनी लोकमतला सांगितले.
या मोर्च्यात डहाणू, सातपाटी, उत्तन, वसई, पालघर, बोईसर, रायगड,कुलाबा, वेसावे, मढ, भाटी, मालवणी, गोराई, माहीम, खारदांडा, वरळी, ठाणे, भांडुप, पनवेल, नवी मुंबई इत्यादी ठिकाणाहून मच्छिमार बांधव व महिला मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.यावेळी मच्छिमार बांधवानी सरकार आणि प्रशासनाविरोधत घोषणेबाजी केली. मच्छिमार एकजुटीचा विजय असोचा नारा देत या मोर्च्यात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती बरोबर अनेक मच्छिमार संघटनांनी सहभाग दर्शविला.
क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई आणि दादर येथील मीनाताई ठाकरे मासळी मंडईवर केलेल्या षडयंत्रांच्या विरोधात मच्छिमार एकजूट झाले असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती चे अध्यक्ष देवेंद्र द तांडेल यांनी सांगितले.
आमच्या हक्काचा हुस्कावलेल्या जमिनी आणि मासळी मंडई आम्हला परत हवे असल्याची घोषणा तांडेल यांनी मोर्च्यात केली आणि जर शासनाने आणि प्रशासनाने आमच्या मागण्यांची दाखल दहा दिवसात घेतली नाही तर पंधराव्या दिवशी उग्र आंदोलन करून झोपलेल्या सरकारला दणका देण्यात असल्याचे तांडेल यांनी सांगितले.
मोर्च्यात सामील झालेल्या शिष्टंडळाने सुधार खात्याचे सहआयुक्त रमेश पवार यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली. सदर बैठकीत पवार यांनी मच्छीमारांची क्रोफ्रर्ड मार्केट येथील मासळी मंडई संदर्भातील आरक्षण पुनर्स्थापित करण्याच्या मागणीला आणि दादर येथील मासळी मंडईच्या महिलांना पुन्हा त्याच जागे पुनर्वसन करण्याच्या मागणीला वरिष्ठांकडे सोपवण्यात येईल. मच्छिमारांनी या बैठीत नाराजी व्यक्त करत पालिकेची नकारात्मक मानसिकतेवर टीका करतना आयुक्तांनी शिष्टमंडळाला भेट दिली नसल्याची नाराजी बैठकीत व्यक्त केली.
त्यानंतर मच्छीमारांच्या शिष्टमंडळबरोबर मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख यांच्या सोबत बैठक झाली. मच्छिमारांच्या मागण्या पालिकेकडून मान्य करण्यासाठी पालिकेच्या आयुक्तांबरोबर लवकर बैठक घेऊन समानाधकरक तोडगा काढण्यात येईल. तसेच कोळीवाडे व गावठणाच्या आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन अस्लम शेख यांनी दिल्याची माहिती देवेंद्र तांडेल यांनी लोकमतला दिली. मोर्चात समितीच्या वतीने बर्नार्ड डिमेलो, संजय कोळी, नयनाताई पाटील, ॲड. कमलाकर कांडेकर, प्रदीप टपके, विनोद पाटील, शुभांगी कुटे, राजश्रीताई भानजी प्रफुल भोईर, जी.एस. पाटील, दिगंबर वैती, संतोष मर्दे, विश्वनाथ सालीयान, कुंदन दवणे आदी मान्यवर उपस्थित होते.