पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार अक्षय कुमार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 01:31 PM2018-06-19T13:31:48+5:302018-06-19T13:31:48+5:30
यशराज आणि चंद्रप्रकाश यांच्यात या सिनेमासंदर्भात चर्चा झाली आहे आणि सध्या स्क्रिप्टसाठी रिसर्च टीम कामाला लागली आहे. यात प्रमुख भूमिकेसाठी अक्षय कुमारच्या नावाची चर्चा आहे.
मुंबई - सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक आणि ऐतिहासिक सिनेमांचा ट्रेंड सुरू आहे. हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरत आहेत. तसेच 'पद्मावत'सारख्या काही सिनेमांना अडचणींचा सामनादेखील करावा लागतोय. सध्या कंगना राणौत राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका मोठ्या पडद्यावर घेऊन येतेय तर दुसरीकडे यशराज बॅनर पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर सिनेमा तयार करण्याचा विचारात आहे. हा सिनेमा बिग बजेट असणार आहे. यशराज फिल्म्स आणि 'चाणक्य','पिंजर' सारख्या मालिका आणि सिनेमांचे दिग्दर्शन केलेले चंद्रप्रकाश द्विवेदी मिळून या सिनेमाची निर्मिती करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार यशराज आणि चंद्रप्रकाश यांच्यात या सिनेमासंदर्भात चर्चा झाली आहे आणि सध्या स्क्रिप्टसाठी रिसर्च टीम कामाला लागली आहे. यात प्रमुख भूमिकेसाठी अक्षय कुमारच्या नावाची चर्चा आहे.
टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पृथ्वीराज चौहानची भूमिका अक्षय कुमार साकारताना दिसणार असल्याचे समजतेय. आधी या भूमिकेसाठी रणवीर सिंग यांच्या नावाची देखील चर्चा झाली होती. अक्षय कुमार आपल्या सिनेमांत स्टंट आणि अॅक्शन स्वत: करतात त्यामुळे जवळपास त्याचे नाव फायनल करण्यात आले आहे. अक्षय कुमार शिवाय यात इतर स्टार कास्टचे नाव फायनल होणे अजून बाकी आहे.
पृथ्वीराज चौहान यांचा जन्म 1168 साली झाला होता. ते अजमेरचे राजा सोमेश्वर चौहान यांचे सुपूत्र होते. पृथ्वीराज चौहान यांनी वयाच्या 13व्या वर्षी राजगडची गादी संभाळली होती. पृथ्वीराज चौहान यांच्याकडे एक योद्धा राजा म्हणून पाहण्यात येते.
अक्षय कुमारच्या सिनेमांबाबत बोलायचे झाले तर नुकताच त्यांने केसरीची शूटिंग पूर्ण केली आहे आणि गोल्डचे काही सीन्स तो सध्या शूट करत आहे. केसरीमध्ये तो हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. सारगढी युद्धाची कहाणी शीख इतिहासात मोठ्या गर्वाने सांगितली जाते. हे युद्ध १८९७ मध्ये झाले होते.