Join us

अक्षय तृतीयेपासून अक्षयदान व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुरुमंदिर प्रकाशनद्वारा प्रकाशित पत्रभेट- भेट सद्गुरूंशी या कौटुंबिक मासिकाच्या २१ व्या वर्षानिमित्त दर महिन्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गुरुमंदिर प्रकाशनद्वारा प्रकाशित पत्रभेट- भेट सद्गुरूंशी या कौटुंबिक मासिकाच्या २१ व्या वर्षानिमित्त दर महिन्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, अक्षय तृतीयेपासून अक्षयदान सहादिवसीय आभासी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.

या आभासी व्याख्यानमालेंतर्गत वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त शरद जोशी १४ मे रोजी वासुदेवानंद सरस्वती यांच्या मंत्रांची उपयुक्तता विशद करणार आहेत. १५ मे रोजी वासुदेव निवासचे विश्वस्त देवीदास जोशी हे वासुदेवानंद सरस्वतीप्रणीत मानसपूजा समजावून सांगणार आहेत. डॉ. सुनीता जोशी या १६ मे रोजी ‘अंकशास्त्र’, तर १७ मे रोजी ‘पास्ट लाइफ रिग्रेशनथेरपी’ या विषयांवर विचार प्रकट करतील. १८ आणि १९ मे रोजी प्रा.

अशोक पोफळे हे ‘हस्तरेषाशास्त्र - एक परिपूर्ण शास्त्र कसे आहे’ यावर भाष्य करणार आहेत.

..............................