अक्षय्य तृतीयेला दागिने खरेदीची झळाळी उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 06:00 AM2020-04-26T06:00:06+5:302020-04-26T06:00:23+5:30

राष्ट्रीय स्तरावर सोने खरेदीचा व्यवहार केवळ १० ते २० टक्के व तोही केवळ आॅनलाइन होईल, असा अंदाज सराफांनी वर्तविली आहे.

Akshayya Tritiya will be busy buying jewelery | अक्षय्य तृतीयेला दागिने खरेदीची झळाळी उतरणार

अक्षय्य तृतीयेला दागिने खरेदीची झळाळी उतरणार

googlenewsNext

सचिन लुंगसे
मुंबई : कोरोनामुळे सध्या देशात लॉकडाउन असून सर्व बाजारपेठा बंद आहेत. याचा फटका सराफा बाजारालाही बसला आहे. परिणामी रविवारी अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर राष्ट्रीय स्तरावर सोने खरेदीचा व्यवहार केवळ १० ते २० टक्के व तोही केवळ आॅनलाइन होईल, असा अंदाज सराफांनी वर्तविली आहे. या मुहुर्तावर सोन्याच्या दागिन्यांची खरेदी कमी तर सोन्याच्या नाण्यांची खरेदी जास्त होईल. गोल्ड पेपरलाही अधिक भाव असेल, असे सराफांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सराफ बाजारातील उलाढालीवर अधिक माहिती देताना सांगितले की, ग्राहकांकडून गुढीपाडव्याप्रमाणे अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी केली जाते. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर १० ते २० टक्केच खरेदी होईल. तीदेखील जे ग्राहक आॅनलाइन पोर्टलाचा वापर करतात तेच ग्राहक करतील. रविवारच्या या मुहुर्तावर दागिन्यांची खरेदी कमी तर सोन्याच्या नाण्यांची खरेदी जास्त होईल. आॅनलाईनचा विचार करता ३० टक्के ग्राहकांनी शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोन्याच्या भावाबाबत, तत्सम व्यवहाराबाबत चौकशी केली होती. मात्र यावेळेपर्यंत मागणी आलेली नाही. लॉकडाउननंतर खरेदी मोठ्या प्रमाणावर होईल. कारण बहुतांश विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. सराफा बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाउनमुळे सराफा बाजाराचे एका दिवसाचे नुकसान जवळपास २०० कोटी रुपये होत आहे.
>विक्रीची परवानगी द्यावी’
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा कायमच सोन्याच्या भावावर परिणाम होत असतो. आजघडीला आपल्या रुपयाचे मूल्य घसरले आहे. बाजारभाषेत त्यास रुपया ‘वीक’ होत आहे, असे म्हटले जाते. सोन्याचा भाव ४७ हजार रुपयांच्या आसपास आहे. दिवाळीपर्यंत तो ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.

Web Title: Akshayya Tritiya will be busy buying jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.