Join us

अलर्ट! मुंबई, ठाण्यात पुढील दोन तास मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 11:24 AM

Mumbai Rain Updates: मुंबई आणि ठाण्यात पुढील २ ते ३ तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. 

Mumbai Rain Updates: गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसेलल्या पावसानं आज सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई उपनगरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्याकडूनही मुंबई आणि ठाण्यात पुढील दोन तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २-३ तासामध्ये मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच पुढील चार ते पास दिवसात कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत पावसाची संततधार सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे पाणी साचल्यामुळे बंद करण्यात आला आहे. सुदैवानं पावसाचा अद्याप लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक सुरळीत सुरू आहे. पण पावसाचा जोर कायम राहिल्यास लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि बदलापूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई उपनगरात विलेपार्ले, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड सर्व भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेट