मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने जमावबंदीचे आदेश काढला आहे. मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत जमावबंदी आदेश लागूच राहणार असून ३० सप्टेंबरपर्यंत कलम १४४ मुंबईत लागू राहण्याबाबत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जमावबंदी म्हणजे काय आणि कोण करू शकतं लागू ?
काल मुंबई पोलिसांच्या डीसीपी ऑपरेशन्सने सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत एक आदेश जारी केला आहे, जो मुंबई शहरात ३० सप्टेंबरपर्यंत लागू असेल. ३१ ऑगस्ट रोजी राज्य शासनाकडून लॉकडाउनच्या फेज (टप्प्या) निहाय शिथिलता (मिशन बिगेन अगेन) संदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबई पोलिसांकडून हा आदेश काढण्यात आला आहे. यात कोणतेही नवीन निर्बंध लादलेले नाहीत, अशी माहिती पोलीस अधिकारी एन. अंबिका यांनी दिली. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना या दरम्यान प्रवासाची मुभा असणार आहे. मात्र, त्यांना देखील फिजिकल डिस्टन्स ठेवणे, कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे आहे. केवळ अत्यावश्यक काम असेल तरचं घराबाहेर पडावे. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. राज्य सरकार टप्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील आणत आहे. मात्र, दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
जाणून घ्या! जमावबंदी आणि संचारबंदी म्हणजे काय?
अन्य महत्वाच्या बातम्या...
शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता
प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका
दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा
सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा
धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न
सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र
बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा