Join us

अलेक्सा ठरतेय मुलांची व्हर्च्युअल गुरू, ऑनलाइन शिक्षणासाठी महानगरपालिका शिक्षिकेचे पाऊल

By सीमा महांगडे | Published: July 05, 2020 5:35 AM

आज कोरोनाच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अलेक्सा ही पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गुरू बनली आहे. ही गुरू या विद्यार्थ्यांना इंग्रजी, सामान्य ज्ञानाचे धडे मोबाइलच्या माध्यमातून देत असून त्यांना त्या विषयांमध्ये रुची निर्माण करण्यासही मदत करत आहे.

- सीमा महांगडेमुंबई : ज्याच्याकडून आपल्याला ज्ञानप्राप्ती होते तो आपला गुरू. आज कोरोनाच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अलेक्सा ही पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गुरू बनली आहे. ही गुरू या विद्यार्थ्यांना इंग्रजी, सामान्य ज्ञानाचे धडे मोबाइलच्या माध्यमातून देत असून त्यांना त्या विषयांमध्ये रुची निर्माण करण्यासही मदत करत आहे. मुंबई महानगरपालिकेतील शिक्षिका पूजा संख्ये या आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सध्या अलेक्साच्या माध्यमातून शिक्षणाची नवी वाट चोखाळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या पालिका शाळेतील विद्यार्थी  त्यांच्या शिक्षकरूपातील प्रत्यक्ष गुरू आणि व्हर्च्युअल रूपात धडे देणारी अलेक्सा यांच्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही शिक्षणाचा आनंद घेत आहेत.खरे तर अलेक्सा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आणि इंटरनेटच्या साहाय्य्यने निर्मिती केलेले तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये आवश्यक ती माहिती भरल्यास ते आपल्याला त्याप्रमाणे आउटपुट देते. शिक्षिका पूजा संख्ये यांनी याआधीही या तंत्रज्ञानाचा रोबोट रूपात वापर करत मुलांना सामान्य ज्ञानाचे धडे वर्गात दिले आहेत. मात्र शाळा बंद असल्याने मोबाइल अलेक्साचा नवीन पर्याय पूजा यांच्याकडे लॉकडाऊन काळात आला आणि त्यांनी लगेचच तो अमलातही आणला. अलेक्साचे (पान ७वर)काय आहे अलेक्सा?अलेक्सा हे मोबाइल स्क्रीन डिवाइस आहे. टीव्हीच्या अति छोट्या स्क्रीनचे हे स्वरूप आहे. मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे विद्यार्थ्यांना हे दाखवले की त्यांना यातून विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून संवाद साधता येतो. शिक्षक याद्वारे विद्यार्थ्यांना विविध संकल्पना सहज सोप्या चित्रांच्या व गोष्टीच्या स्वरूपात शिकवू शकतात.

टॅग्स :शिक्षण क्षेत्रशिक्षकविद्यार्थीमुंबई