Join us

फी भरण्यासाठी पैसे नसलेली अल्फीया पुन्हा शाळेत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 7:07 AM

नुकताच दहावी पास झालेल्या सोहेलने आपल्या शेजारी राहणाऱ्या आणि शाळेची फी भरायला पैसे नाहीत, म्हणून शाळाबाह्य असणा-या अल्फीयाची माहिती बालरक्षकांना दिली.

- सीमा महांगडे मुंबई - नुकताच दहावी पास झालेल्या सोहेलने आपल्या शेजारी राहणाऱ्या आणि शाळेची फी भरायला पैसे नाहीत, म्हणून शाळाबाह्य असणा-या अल्फीयाची माहिती बालरक्षकांना दिली. आज ती शाळेत जाण्यामागे सोहेलचा खारीचा वाटा आहे. एकूणच शाळाबाह्य मुले, तसेच शाळेत अनियमित असणा-या मुलांना शाळेत आणण्यासाठी, तसेच त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने बालरक्षक ही संकल्पना आणली आणि त्याला शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता नागरिक आणि विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी होऊन मोलाचे योगदान देत आहेत.सांताक्रुझच्या एका मोठ्या आणि खासगी इंग्रजी माध्यमात शिकणाºया अल्फीयाला तिचे शिक्षण चौथीतच अर्धवट सोडावे लागले. मुस्लीम समजातील अल्फीयाचे वडील तिच्या आईला आणि भावंडाना सोडून दुसरीकडे निघून गेले. वडील घर सोडून गेल्यामुळे २ मुली आणि घराची जबाबदारी अल्फीयाच्या आईला पेलविणे अशक्य झाले. त्यामुळे अल्फीयाची शाळा सुटली आणिती शाळाबाह्य झाली. सहा महिने उलटून गेल्यावरही परिस्थिती बदलली नाही.आईला तिला शिकविण्याची इच्छा असूनही, पैशांच्या कमतरतेमुळे अल्फीयाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळणे अवघड झाले आहे. हे सर्व सोहेल जवळून पाहात होता. आपल्या शाळेतील शिक्षक आणि बालरक्षक असलेले रामराव पवार शाळाबाह्य मुलांसाठी काम करत असल्याची माहिती सोहेलला असल्यामुळे त्याने याची माहिती त्यांना दिली.यानंतर, रामराव पवार यांनी आपल्या शाळेच्या सहकारी चौधरी मॅडम यांच्यासह अल्फीयाच्या आईची भेट घेतली आणि तिला जवळच्याच पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. तिला प्रवेश घेऊन देताना प्रशासनाची असलेली अनास्था दिसून आली. मात्र, बालरक्षक चळवळीच्या यशामुळे तिला प्रवेश मिळवून देणे शक्य झाल्याची प्रतिक्रिया पवार यांनी दिली.सामाजिक बांधिलकी, मानवतेचे कार्यदोन मुली आणि घर सांभाळणे अल्फीयाच्या आईला कठीण होत असल्याने, बालजीवन या सेवाभावी संथेने त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. सदर संस्था अल्फीयाला शिकवणी आणि एक वेळेचे जेवण देणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली. बालरक्षकांची मोहीम हे सामाजिक बांधिलकी, मानवतेचे कार्य असून, ती आता जनमानसात रुजत असल्याचे समाधान बालरक्षकांची टीम व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया रामराव पवार यांनी दिली.

टॅग्स :मुंबईशिक्षण क्षेत्र