६६ विद्यार्थ्यांना पुरविल्या दहावीच्या सर्व प्रश्नपत्रिका, कल्याणमधून शिक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 05:03 AM2018-04-06T05:03:12+5:302018-04-06T05:03:12+5:30

दहावीची परीक्षा पास करून देण्याची हमी देत त्यांच्याकडून मोठे पॅकेज आकारणाऱ्या खासगी कोचिंग क्लासेसचा छडा लावण्यात एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकाला गुरुवारी यश आले. या प्रकरणी आतिश अशोक कदम (३२) नामक शिक्षकाच्या कल्याणमधून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

All the 10th standard papers which were provided to 66 students, teacher was arrested in Kalyan | ६६ विद्यार्थ्यांना पुरविल्या दहावीच्या सर्व प्रश्नपत्रिका, कल्याणमधून शिक्षकाला अटक

६६ विद्यार्थ्यांना पुरविल्या दहावीच्या सर्व प्रश्नपत्रिका, कल्याणमधून शिक्षकाला अटक

Next

- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई  - दहावीची परीक्षा पास करून देण्याची हमी देत त्यांच्याकडून मोठे पॅकेज आकारणाऱ्या खासगी कोचिंग क्लासेसचा छडा लावण्यात एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकाला गुरुवारी यश आले. या प्रकरणी आतिश अशोक कदम (३२) नामक शिक्षकाच्या कल्याणमधून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्याने जवळपास ६६ विद्यार्थ्यांना सहाच्या सहा प्रश्नपत्रिका पुरविल्याची माहिती उघड झाली आहे.
कदमचे मुंब्रा आणि अंबरनाथ परिसरात घर आहे. ‘किड्स पॅराडाईस’ शाळेचा पोलिसांच्या ताब्यात असलेला उपमुख्यध्यापक फिरोज खानच्या खासगी शिकवणीची शाखा औरंगाबादमध्ये आहे. येथे कदम शिक्षक आहे. त्या ठिकाणी दहावीच्या २६ विद्यार्थ्यांना त्याने सर्व प्रश्नपत्रिका सकाळी सव्वा नऊच्या सुमारास पुरविल्या, अशी माहिती नायक यांच्या विशेष पथकाला मिळाली. फिरोजच्या चौकशीत त्याने कदमचे नाव घेतले. त्यानुसार नायक यांच्या पथकाने त्याच्या मागावर राहत कल्याणमधून त्याचा गाशा गुंडाळला.
विद्यार्थ्यांना दहावीत पास करून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून भरमसाठ फी फिरोजच्या या टोळीतील कदमने आकारली होती. मला दहावीचे सेंटर मिळणार आहे, त्या वेळी आपण हे मोठे काम करू, असे फिरोजने कदमला सांगितल्याचे तपासात सांगितले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील मोबाइल, अन्य वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. कदमची अटक ही प्रकरणातील सहावी अटक आहे. या प्रकरणी आधी पोलिसांनी फिरोझसह इम्रान शेख, अन्वरून शेख, प्रशांत धोत्रे आणि रोहित सिंग यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अंबरनाथ ‘विसडम क्लासेस’मध्ये ४० विद्यार्थी

अंबरनाथमध्ये ‘विसडम क्लासेस’ नावाने मुनीर नावाची व्यक्ती खासगी क्लासेस चालवते. कदमने या क्लासच्या ४० विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नपत्रिका पुरविल्याचे नायक यांच्या पथकाने केलेल्या तपासात उघड झाले. अजून सहा ते सात जणांची नावे कदमने पोलिसांना सांगितली आहेत. त्यानुसार मुनीर आणि या अन्य लोकांनाही लवकरच अटक केली जाणार आहे.

Web Title: All the 10th standard papers which were provided to 66 students, teacher was arrested in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.