‘स्मार्ट’ प्रकल्पामध्ये राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधित्व मिळावे - कृषिमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:07 AM2021-01-20T04:07:07+5:302021-01-20T04:07:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शेतमालाच्या सर्वसमावेशक मूल्य साखळ्यांचा विकास करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतमालाच्या सर्वसमावेशक मूल्य साखळ्यांचा विकास करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. या योजनेतून राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशा सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी केल्या.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत कृषिमंत्र्यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, उपसचिव सुशील खोडवेकर आदी उपस्थित होते. स्मार्ट प्रकल्पासाठी अर्ज करण्याकरिता पोर्टल सुरू केले हाेते. त्यानुसार ११ हजार ५८४ लोकांनी नोंदणी केली असून, ५ हजार ७६४ संस्थांनी अर्ज सादर केले. यामध्ये सुमारे २ हजार शेतकरी उत्पादक कंपन्या असून २,८३३ आत्मा नोंदणीकृत गट आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल अभियान सुरू केले असून, याअंतर्गत या प्रकल्पाच्या माध्यमातून मूल्य साखळ्यांचा विकास सुरू केला जाईल, असे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. यावेळी प्रकल्पांतर्गत केल्या जाणाऱ्या विविध कामांसंदर्भात सादरीकरण करण्यात आले.
.............................................