सेना शाखाप्रमुखास मारहाण करणाऱ्या चौघांना अटक
By admin | Published: March 28, 2016 01:56 AM2016-03-28T01:56:43+5:302016-03-28T01:56:43+5:30
क्षुल्लक कारणावरून सावरकरनगर येथील शाखाप्रमुख दीपक निकम यांच्यासह चौघांना लोखंडी रॉड आणि लाकडी स्टम्पने बेदम मारहाण प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे : क्षुल्लक कारणावरून सावरकरनगर येथील शाखाप्रमुख दीपक निकम यांच्यासह चौघांना लोखंडी रॉड आणि लाकडी स्टम्पने बेदम मारहाण प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
हर्षल चव्हाण, रोहित थापा, स्वप्निल जाधव आणि इजाज अहमद अशी सावरकरनगर येथील घटनेत अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिवजयंतीची मिरवणूक संपल्यानंतर रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास महात्मा फुलेनगरात राहणारा हर्षल चव्हाण याच्यासह १० ते १२ जणांचे टोळके तेथे आले. या सर्वांनी केशव शेळके, अशोक दळवी आणि आनंद गरुड यांना स्टम्प आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या शाखाप्रमुख निकम यांनाही त्यांनी मारहाण केली. कनोजिया यांनी वर्तकनगर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक भूषण दायमा हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)