मुंबई - ऑल इंडिया सुन्नी जामियातुल उलामा या संघटनेन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना पत्र लिहिले आहे. मुंबईतील मशिदीवर लाऊडस्पीकर वापरासाठी परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमाचे पालन करु असं देखील या पत्रात म्हटलं आहे.
मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना ज्या मशिदींनी परवानगी मागितली आहे त्यांना मुभा देण्याची सूचना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी द्याव्या अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. आम्ही मशिदीच्या ट्रस्टींना तात्काळ परवानगीसाठी पोलिसांना अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन करत आहोत.
मशिदींवरील भोंग्यांचा संपूर्ण देशाला त्रास होतोय यात धार्मिक विषय कुठे. तुम्हाला जे काही करायचंय घरात करा. शहरातील रस्ते, फुटपाथ का अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय? आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका हे जर सांगून समजत नसेल तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच," असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यांत देखील राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे.