मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत मंगळवारी १४ एप्रिलला समाप्त होत असताना त्याला आणखी ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. त्यामुळे सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर असलेली बंदी ३ मे रोजी मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत लागू करण्याचा निर्णय केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. मालवाहतूक करणारी विमाने व डीजीसीए ने परवानगी दिलेली उड्डाणे यांना हे निर्बंध लागू होणार नाहीत.
अनेक खासगी विमान वाहतूक कंपन्यांनी १५ एप्रिलपासून देशांतर्गत विमान प्रवासाचे आरक्षण करण्यास व १ मे पासूनच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे आरक्षण करण्यास प्रारंभ केला होता. ज्या प्रवाशांनी आरक्षण केले त्यांना कंपन्यांकडून रद्द झालेल्या प्रवासाचा परतावा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मात्र, यादरम्यान काही विमान कंपन्यांनी आरक्षण सुरु केल्याने सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशनने चिंता व्यक्त केली होती.अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना तिकीटाची रक्कम परत करण्याऐवजी त्यांना भविष्यातील प्रवासासाठी तिकीटाच्या किंमतीचे व्हाऊचर देण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र जेव्हा प्रत्यक्षात प्रवास केला जाईल त्यावेळी असणाऱ्या तिकीट दराप्रमाणे फरक दिला जाईल.३ मेपर्यंत एक्स्प्रेस, लोकल बंदरेल्वे मंत्रालयाने देशातील प्रीमियम गाड्या, मेल/एक्स्प्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, उपनगरी लोकल, कोलकाता मेट्रो रेल, कोकण रेल्वे ३ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत अत्यावश्यक बाबी वाहून नेणाºया मालगाड्यांची वाहतूक सुरू असेल़ अनारक्षित आणि प्रवासी आरक्षण केंद्रातील सर्व तिकीट काउंटर पुढील आदेशापर्यंत बुकिंगसाठी बंद राहतील. ३ मेनंतरच्या ई-तिकिटांसह कोणतीही बुकिंग केली जाणार नाही. ज्यांनी काउंटरवर तिकिटे बुक केली, त्यांना३१ जुलै पर्यंत परतावा मिळेल.