मुंबई : रिलायन्स जिओने १ जानेवारीपासून सर्व लोकल व्हाईस कॉल मोफत केले आहेत. ट्रायच्या आदेशाप्रमाणे १ जानेवारीपासून इंटरकनेक्ट युसेज चार्जेस (आयसीयू) ची आकारणी बंद झाली आहे. त्यामुळे सर्व स्थानिक व्हाईस कॉल मोफत करण्याचा निर्णय जिओने जाहीर केला आहे.
काही महिन्यांपूर्वी जिओने आपल्याच नंबरवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल नंबरवर कॉल केल्यासही पैसे आकारणी सुरू केली होती. त्यासाठी आयसीयू चार्जेस द्यावे लागत असल्याचे कारण दिले होते. आता आयसीयू चार्जेसच रद्द झाल्याने रिलायन्सने ही सुविधा दिली आहे.