Join us

राज्यातील सर्वच खासदार कोट्यधीश!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:39 AM

महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेले सर्वच्या सर्व ४८ खासदार कोट्यधीश असून त्यांची सरासरी मालमत्ता रु. २३.०४ कोटी इतकी आहे.

मुंबई : महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेले सर्वच्या सर्व ४८ खासदार कोट्यधीश असून त्यांची सरासरी मालमत्ता रु. २३.०४ कोटी इतकी आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींजी यांच्याकडे २.७८ कोटी रुपयांची संपत्ती असली तरी त्यांच्याकडे पॅनकार्ड नाही.असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या रिपोर्टनुसार राज्यातील ४८ खासदारांपैकी राष्टÑवादी काँग्रेसच्या चार खासदारांकडे सर्वाधिक म्हणजे सरासरी ८९.४१ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या २३ खासदारांकडे सरासरी २१.११ कोटींची मालमत्ता आहे. १८ शिवसेनेच्या प्रति विजेते उमेदवारांची सरासरी मालमत्ता रु. १२.९७ कोटी आहे. काँग्रेसचा एकमेव उमेदवार विजयी झाला असून चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्याकडे १३.७४ कोटींची संपत्ती आहे. तर आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुलच्या (एमआयएम) विजेते उमेदवाराची सरासरी मालमत्ता २.९५ कोटी इतकी आहे.>२८ खासदारांवर गुन्हे दाखलराज्यातील ४८ पैकी २८ (५८%) विजेते उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे. पैकी १५ जणांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि धमकावणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.पक्षनिहाय विचार केला तर भाजपच्या १३, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आणि काँग्रेस या पक्षाच्या प्रत्येकी एका खासदारावर गुन्हा दाखल आहे. या सर्व कोट्यधीश खासदारांकडे विविध बँकांची आणि वित्तीय संस्थांची देणीही आहेत. त्यात भाजपच्या २३ खासदारांकडे सरासरी ५.५४ कोटी, शिवसेनेच्या १८ खासदारांकडे १.२३ कोटी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार खासदारांकडे सरासरी ५६ लाख रुपयांची देणी बाकी आहेत.