मुंबईतील सर्व महापालिका उद्यान सकाळी ५ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत खुली ठेवावीत
By मनोहर कुंभेजकर | Published: February 14, 2024 06:50 PM2024-02-14T18:50:12+5:302024-02-14T18:51:01+5:30
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
मनोहर कुंभेजकर, मुंबई: मुंबईतील महापालिका उद्यान सकाळी ६ ते १० व सायं. ४ ते ८ पर्यंत सुरू असतात.मात्र मुंबईतील सर्वसामान्य व कष्टकरी जनता यावेळी कामकाजाच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांना उद्यानांत जाता येत नाही.जागेच्या अडचणींमुळे अनेक विद्यार्थी उद्यानात अभ्यास करतात, परंतू उद्यानांच्या वेळांमुळे विद्यार्थ्यांना तेथे अभ्यास करता येत नाही.मुंबईत मुळातच मोकळ्या जागांचा अभाव असल्याने अनेक मुंबईकर रात्री मुख्य रस्त्यांवर जॉगिंग करताना दिसून येतात.
त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची उपरोक्त अडचण लक्षात घेता मुंबईतील महापालिकांची उद्याने सर्व सुख-सोयीं, महिलापुरुष सुरक्षा रक्षकासंह सकाळी ५:३० ते रात्री १०:३० वाजेपर्यंत मुंबईकरांसाठी खुली ठेवण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष ॲड.अमोल मातेले मुंबई महानगर पालिकेचे उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.