Join us  

मोदींच्या महापुराविरोधात सर्व विरोधक एकवटलेत - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 4:50 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. प्रामाणिक, पारदर्शक आणि संवेदनशील सरकार कसे असते, याचे उदाहरण म्हणजे मोदी सरकार. त्यांच्या महापुराविरोधात सर्व राजकीय विरोधक एकत्र आले आहेत, असे सांगितले. 

ठळक मुद्देप्रामाणिक, पारदर्शक आणि संवेदनशील सरकार कसे असते, याचे उदाहरण म्हणजे मोदी सरकार.

मुंबई : भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त आज मुंबईत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. प्रामाणिक, पारदर्शक आणि संवेदनशील सरकार कसे असते, याचे उदाहरण म्हणजे मोदी सरकार. त्यांच्या महापुराविरोधात सर्व राजकीय विरोधक एकत्र आले आहेत, असे सांगितले. आगामी म्हणजेच 2019 साली पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली देशातील निवडणुका लढणार आणि जिंकणार सुद्धा असा आत्मविश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, भाजपा लोकशाही मूल्यांवर चालणारा पक्ष आहे. 11 कोटींहून अधिक सदस्यांसह जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला आहे. लोकसभेच्या दोन सदस्यांपासून 330 सदस्यांपर्यंत भाजपाने प्रवास केला आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काँग्रेस पक्षापासून मुक्त नव्हे, तर काँग्रेसच्या संस्कृतीपासून मुक्त भारत करायचा आहे. तसेच, पारदर्शी, शेतकरीमित्र सरकार कसे असते, हे महाराष्ट्र सरकारने दाखवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची यांची जयंती मोठ्या उत्साहात देशभर साजरी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :अमित शाहमुंबईभाजपा