Join us

दृष्यकला परीक्षेचे सर्व पेपर आॅनलाइन पाहता येणार, सीईटी सेलकडून राज्यातील पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 6:56 AM

कलेच्या फाईन आर्टस, अप्लाइड आर्टस प्रवेशांमध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि प्रवेश प्रक्रियेत सुलभीकरण व्हावे यासाठी यंदा पहिल्यांदाच सीईटी सेलकडून दृष्यकलेच्या परीक्षेचे सर्व पेपर विद्यार्थ्यांना आॅनलाइन उपलब्ध करून दिले आहेत.

- सीमा महांगडेमुंबई : कलेच्या फाईन आर्टस, अप्लाइड आर्टस प्रवेशांमध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि प्रवेश प्रक्रियेत सुलभीकरण व्हावे यासाठी यंदा पहिल्यांदाच सीईटी सेलकडून दृष्यकलेच्या परीक्षेचे सर्व पेपर विद्यार्थ्यांना आॅनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. ३,५०० हुन अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या चित्रांच्या गुणांविषयी कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी ही सोय करण्यात आली असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. दृष्यकलेच्या परीक्षेचे पेपर विद्यार्थ्यांना आॅनलाईन उपलब्ध करून देण्याचा हा राज्यतील पहिलाच प्रयोग आहे.राज्यात कला संचालनालयाच्या अखत्यारीत एकूण ९ महाविद्यालये असून त्यातील ४ शासकीय तर ५ खाजगी आहेत. ९ महाविद्यालयांत कला प्रवेशासाठी एकूण ६०० जागा उपलब्ध असून, त्यासाठीची प्रवेश परीक्षा सीईटी सेलकडून घेण्यात आली आणि निकालही जाहीर करण्यात आला आहे.यात प्रॅक्टिकल आणि आॅनलाईन अशा दोन टप्प्यांत परीक्षा घेतली जाते. आॅनलाइनमध्ये जनरल नॉलेजवर प्रश्न विचारले जातात. तर प्रॅक्टिकलमध्ये मेमरी, आॅब्जेक्ट, डिझाईन यात विविध विषय देऊन विद्यार्थ्यांना चित्र काढण्यास सांगितले जाते.अनेकदा हे पेपर तपासून झाल्यावर विद्यार्थ्याला आपल्या चित्राचे गुण कोणत्या निकषांच्या आधारे आणि कसे दिले गेले? विद्यार्थ्याने नेमके काय चित्र काढले याबाबत संभ्रम निर्माण होत होतात. या साऱ्याची उत्तरे देण्यासाठी आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी यंदा सीईटी सेलकडून ही सगळी चित्रे आणि त्यांचे गुण स्कॅन करून अपलोड करण्यात आले आहेत.‘विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारी सोडविल्या’प्रॅक्टिकलमधील ३ विषयांतील प्रत्येकी तीन हजारांहून अधिक याप्रमाणे १० हजारांहून अधिक चित्रे स्कॅन करून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे आता कोणत्या चित्राला किती आणि कसे गुण मिळाले? याबाबत पारदर्शकता निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी सीईटी सेलकडून मुदत ही देण्यात आली होती. या तक्रारीही सीईटी सेलच्या संबंधित विभागाकडून सोडविण्यात आल्याची माहिती जे जे कला महाविद्यालयाचे प्राचार्य शार्दूल कदम यांनी दिली.वद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया गुणांबाबत निकषही आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आले असून, हे निकष परीक्षेआधीच वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्याला कमी गुण मिळाले, जाणीवपूर्वक नापास केले असे आक्षेप विद्यार्थ्यांना घेता येणार नाहीत. परिणामी प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ थांबल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :शिक्षण क्षेत्र