Join us

सर्व पक्ष अखेर स्वतंत्रपणे लढणार!

By admin | Published: January 19, 2015 9:54 PM

या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पालघर (अ) भागातील ८ जागांसाठी ६० उमेदवारी अर्जांपैकी २८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ३२ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत.

पालघर : या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पालघर (अ) भागातील ८ जागांसाठी ६० उमेदवारी अर्जांपैकी २८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ३२ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी ८९ उमेदवारी अर्जांपैकी ३३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ५६ उमेदवारांमध्ये लढती रंगणार आहेत.पालघर तालुक्यात सर्व पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला असून काही थोडक्या भागांत मैत्रीपूर्ण लढती रंगणार आहेत. पालघर जिल्ह्यातील जि.प. व त्या अनुषंगाने होणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर बहिष्काराचा बार फुसका ठरल्यानंतर आज आघाडीसाठी बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व इतर मित्र पक्षांत उशिरापर्यंत सुरू राहिलेली बैठक कुठलाही ठोस निर्णय न होता संपली. या वेळी सेना-भाजपानेही स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.पालघर (अ) भागातील ८ जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात असून पंचायत समित्यांच्या १६ जागांसाठी ५६ उमेदवारांमध्ये लढती रंगणार आहेत. (वार्ताहर)४जिल्हा परिषद पालघर व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत अर्ज माघारी घेण्याची व पक्षाचे एबी फॉर्म भरण्याची मुदत सोमवार, १९ जानेवारी दुपारी ३ वा.पर्यंत होती. तसेच दुपारी ३.३० नंतर उमेदवारांना चिन्हेवाटप करण्यात आली. अखेरच्या दिवशी जि.प. सदस्यांसाठी ८ तर पं.स.साठी एकूण १७ अर्ज माघारी घेण्यात आले. जव्हार जि.प. ५ गटगट क्र.गटाचे नावउमेदवार२३वावर४२४हिरडपाडा४२५न्याहाळा५२६कोरतड६२७पाथर्डी५एकूण २४पंचायत समिती १० गणगट क्र.गटाचे नावउमेदवारसाखरशेत४५४वावर४६४सारसून४७५हिरडपाडा४८४न्याहाळा४९६कौलाळे५०५कोरतड५१४पिंपळशेत५२५कासटवाडी५३६पाथर्डी५४६एकूण४९ या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी व सीपीएम यांनी युती केलेली असून इतर सर्व पक्ष आय काँग्रेस, भाजपा, शिवसेना, बहुजन विकास आघाडी यांनी पुन्हा एकदा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे जि.प.च्या ५ जागांसाठी एकूण २४ उमेदवार रिंगणात, तर पं.स.च्या १० जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पालघर जिल्हयाच्या पालघर तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या तारापूर सह ९ गटामध्ये ३६ तर पंचायत समितीच्या १८ गणामध्ये एकुण ६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून सोमवारी या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हाचेही वाटप केले.जिल्हापरिषदेच्या तारापुर (३७) गटात ५, नवापूर (३८) ५, पास्थळ (३९) ३, बोईसर (४०) २, बोईसर (वंजारवाडा) (४१) ४, सरावली (४२) ३, खैरापाडा (४३) ३, मान (४४) ५, तर बऱ्हाणपूर (४५) ६ असे एकूण ३६ उमेदवार अखेर रिंंगणात असून या ९ गटामध्ये ५५ अर्ज येऊन नवापूर गटातील एका उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये अवैध ठरविण्यात आला होता तर आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ३६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.पालघर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तारापूर गणामध्ये ४, कुरगाव ३, दांडी ५, नवापूर ४, सालवड ३, पास्थळ २, काटकरपाडा (बोईसर ) २, बोईसर ४, बोईसर (वंजारपाडा) ३, दांडीपाडा (बोईसर) ४, उमरोळी - २, खैरापाडा - ३, मान - ५, शिगांव - खुटाड २, बऱ्हाणपूर - ४, टेण - ६ असे एकुण ६५ उमेदवार रिंगणात असून आज ३७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. माघार अस्त्र फसल्याने आता आपली चंगळ होणार या भावनेने सर्वच पक्षाचे कार्यकर्ते मात्र आनंदून गेले आहेत.तलासरी तालुक्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ उमेदवारांनी माघार घेतल्याने ५९ उमेदवार आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले. निवडणुकीवर बहिष्कार टाकून सर्वपक्षीयांनी माघार घेण्याच्या निर्णयाचा फज्जा उडाल्यानंतर आज सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तलासरी तालुक्यात जिल्हा परिषद पाच गट, तर पंचायत समित्यांचे १० गण आहेत. यात जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी २६ उमेदवारांनी तर पंचायत समित्यांच्या १० गणांसाठी ५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज माघार घेण्याच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या २६ पैकी ६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, तर पंचायत समित्यांच्या ५१ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी २० उमेदवार तर पंचायत समित्यांच्या १० गणांसाठी ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागल्याने राजकीय पक्षात चैतन्य संचारले आहे.