Ajit Pawar ( Marathi News ) : राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांचे राज्यभर आंदोलनही सुरू असून जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. काही दिवसापूर्वी राज्य सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली होती. आता पुन्हा एकदा आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीसोबत बोलताना माहिती दिली.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांसोबत चर्चा केली होती. याबाबत एक तारीख ठरवून बैठकही घेतली होती. त्यावेळी काही राजकीय पक्षाचे नेते त्या मिटींगला येऊ शकले नाही. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी त्या नेत्यांसोबत संवाद साधला आणि आता पुन्हा एकदा मिटींग बोलावण्याचे ठरवले आहे. आता पुन्हा एकदा आरक्षण प्रश्नावर सर्व पक्षीय मिटींग होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
आता शाळेमध्ये ‘गुड मॉर्निंग’ नव्हे ‘जय हिंद’ बोला! १५ ऑगस्टपासून हरयाणातील शाळांमध्ये उपक्रम
यावेळी अजित पवार यांना जरांगे पाटील यांनी मंत्री भुजबळ यांना दिलेल्या इशाराऱ्यावर बोलताना पवार यांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली. 'महायुती एकत्र बसून विधानसभेसाठी तयारी करणार आहे. आम्ही येणारी विधानसभा एकत्रित सामोपचाराने लढणार आहोत, असंही अजित पवार म्हणाले.
'वक्फ बोर्डाच्या जमिनींना धक्का लागणार नाही'
वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातील जमिनीला कशाही प्रकारचा धक्का लागून त्या जमिनी कोणाच्यातरी घशात जातील हा प्रयत्न होता कामा नये म्हणून आम्ही काळजी घेतली आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढच्या गोष्टी राज्य सरकारकडून केल्या जाणार आहेत, असंही अजित पवार म्हणाले.
एकत्र बसून जागांबाबत ठरवणार
आमच्या महायुतीचे घटक पक्ष एकत्र बसून जागांच्या संदर्भात अंतिम निर्णय घेतील. त्यानंतर उमेदवार ठरवले जातील, आम्ही आणि समोरचेही निवडणूक येणाऱ्या उमेदवारांचा विचार करणार, असंही पवार म्हणाले.
महायुतीत राज्यसभेची जागा आम्ही लढवणार
लोकसभेला आम्ही साताऱ्याची आमची जागा भाजपाला सोडली. त्यावेळी आमच्यात राज्यसभेची जागा आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादीला देण्याच ठरलं आहे. त्याप्रमाणे महायुतीमध्ये आम्ही राज्यसभेची जागा लढवणार आहोत. पियुष गोयल यांची चार वर्षाची जागा आम्हाला मिळावी असं आम्ही सांगितलं होतं, तसं त्यावेळी मान्य करण्यात आलं होतं. आता ती जागा आम्ही लढवणार आहोत. आमच्या पक्षाची पार्लमेंटरी बोर्ड ही जागा कोणाला देईल त्याचा निर्णय घेणार आहे, असंही अजित पवार म्हणाले.