गणेशोत्सवाच्या सर्व परवानग्या आॅनलाइन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 04:36 AM2017-08-08T04:36:32+5:302017-08-08T04:36:32+5:30

राज्यातील गणेशोत्सव हा पारंपरिक उत्सव असल्यामुळे तो शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलीस विभागाने संवदेनशील राहून सुरक्षेचे उपाय योजावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

All the permissions for Ganeshotsava online |  गणेशोत्सवाच्या सर्व परवानग्या आॅनलाइन  

 गणेशोत्सवाच्या सर्व परवानग्या आॅनलाइन  

googlenewsNext

मुंबई : राज्यातील गणेशोत्सव हा पारंपरिक उत्सव असल्यामुळे तो शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलीस विभागाने संवदेनशील राहून सुरक्षेचे उपाय योजावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. तसेच गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने आॅनलाइन देण्यासंदर्भात राज्यातील सर्व आयुक्तालयांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या..
पारंपरिक गणेशोत्सवाच्या तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज आढावा घेतला. यावेळी मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच आयुक्त अजोय मेहता आदी उपस्थित होते. मुंबईतील वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळावी, यासाठी स्थापनेसाठी गणेशमूर्ती सुट्टीच्या दिवशी आणावी, अशा सूचना पोलीसांनी सर्व सार्वजनिक गणेशमंडळांना द्याव्यात, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: All the permissions for Ganeshotsava online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.