मुंबई मेट्रो अंतर्गत समाविष्ट सर्व प्रकल्प वेळेत पुर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 02:32 PM2020-11-13T14:32:53+5:302020-11-13T14:34:16+5:30

Mumbai Metro : मुंबई इन मिनिटस

All the projects included under Mumbai Metro will be completed on time | मुंबई मेट्रो अंतर्गत समाविष्ट सर्व प्रकल्प वेळेत पुर्ण होणार

मुंबई मेट्रो अंतर्गत समाविष्ट सर्व प्रकल्प वेळेत पुर्ण होणार

Next
ठळक मुद्देमेट्रो-२ अ - दहिसर ते डि.एन. नगरमेट्रो-७ - दहिसर पूर्व ते अंधेरी अंधेरी पूर्व१०, २०, ३० आणि ४० रुपयांप्रमाणे तिकिटड्रायव्हरलेस टेक्नोलॉजीवर धावणार मेट्रो

 

मुंबई : मुंबईतल्यामेट्रो प्रकल्पांसह कार्यरत असलेल्या प्रकल्पांचे सुरळीत संचालन करा, असे निर्देश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी दिले. मुंबई मेट्रो अंतर्गत समाविष्ट सर्व प्रकल्प वेळेत पुर्ण करण्यास एमएमआरडीए कटीबध्द आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई मेट्रो प्रकल्पांच्या प्रगतीची विशेष पाहणी करण्यासाठी तसेच कार्यरत असलेल्या प्रकल्पांचे सुरळीत संचालन साधण्याच्या दृष्टीने राजीव यांनी मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या बांधकामांच्या ठिकाणांना भेटी दिल्या. यावेळी ते बोलत होते. मुंबई मेट्रो अंतर्गत समाविष्ट सर्व प्रकल्प वेळेत पुर्ण करण्यास एमएमआरडीए कटीबध्द आहे. तसेच मुंबईकरांसाठी सुरक्षित, सुविधा संपन्न आणि गतिमान प्रवासाचा नवा सक्षम पर्याय निर्माण करून मुंबई इन मिनिटस हे मुंबईकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे, असेही राजीव म्हणाले. प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न हे आता गतीने आकार घेत आहे. या प्रगतीच्या प्रवासात आम्हाला प्रत्येक वेळी पाठींबा देणा-या आणि विविध प्रकारे सहकार्य करणा-या प्रत्येकाचे राजीव यांनी आभार मानले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सुरु असलेली मेट्रोची कामे वेगाने होत असून, मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या ट्रायल जानेवारी महिन्यात सुरु  होणार आहेत. या दोन्ही मार्गासाठी लागणारे मेट्रो रेल्वे कोच चारकोप डेपोत दाखल होत असून, जानेवारी महिन्यातील मेट्रो रेल्वेच्या ट्रायलनंतर प्रत्यक्षात मे महिन्यात या दोन्ही मार्गांवरील मेट्रो प्रवाशांना घेऊन धावणार आहेत. मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७  डिसेंबरपर्यंत सुरु करण्याचा विचार होता. मात्र कोरोनासारख्या असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. आता काम वेगाने सुरु आहे.

 

Web Title: All the projects included under Mumbai Metro will be completed on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.