पदवीधर नोंदणीसाठी सर्वच पक्ष सरसावले, पण नोंदणी मात्र कमीच?

By मनोहर कुंभेजकर | Published: January 1, 2024 07:22 PM2024-01-01T19:22:27+5:302024-01-01T19:22:37+5:30

शिवसेना उबाठा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदार नोंदणीसाठी कंबर कसली आहे.

All the parties rushed for graduate registration | पदवीधर नोंदणीसाठी सर्वच पक्ष सरसावले, पण नोंदणी मात्र कमीच?

पदवीधर नोंदणीसाठी सर्वच पक्ष सरसावले, पण नोंदणी मात्र कमीच?

मुंबई- राज्यात येत्या जून-जुलै मध्ये पदवीधर मतदार संघाची विधानपरिषदेची महत्वाची निवडणूक होणार आहे.शिवसेनेत उभी फूट पडल्याने या निवडणुकीला राजकीय महत्व असून आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकीत मुंबई कोणाची यावर शिक्कामोर्तब होणार आहे.उबाठा मधून पक्षाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ व पक्षाचे सचिव वरुण सरदेसाई व माजी मंत्री,आमदार अँड.अनिल परब यांची नावे चर्चेत आहेत. तर शिंदे गटातून माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा आहे.

उबाठा आणि शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदार नोंदणीसाठी कंबर कसली आहे. आतापर्यंत पदवीधर मतदार नोंदणीच्या दोन राउंड झाल्या आहेत. दर वर्षी भारतात एक कोटी पदवीधर  तयार होतात महाराष्ट्र व मुंबईचा ईतक्या वर्षाचा आकडा ३५ लाखाच्या घरात असेल. पदवीधर निवडणुकीत पदव्युत्तर पदवीधर व पदवीधर मतदार संघात नाव नोंदण्यास पात्र १२+३वर्षाचा डिप्लोमाधारक ही पात्र आहेत. 

आता पर्यंत दोन राऊंड मध्ये उपनगरात 58000 आणि शहरात 20000 अशी मिळून 78000 इतकी कमी नोंदणी  झाली आहे.आता तिसरा राउंड उद्या दि,2 ते दि,15 जानेवारी पर्यंत असणार आहे.या शेवटच्या सत्रात एक लाखांच्या वर तरी नोंदणी झाली पाहिजे यासाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहे.

पदवीधर मतदार संघासाठी शिवसेना, भाजपा,  उध्दव बाळासाहेब ठाकरे गट,मनसे यांनी मधल्या टप्प्यात मतदार नोंदणीसाठी कार्यकर्त्याचे मेळावे बैठका घेतल्या मुख्यमंत्र्यानी नागपूरच्या अधिवेशनातून वेळ काढून पदवीधर नोंदणी साठी आवाहन केले राज ठाकरे तर कार्यकर्त्याचे कान उपटले  . उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवरून आदेश दिले भाजपातील नेत्यानी गुप्त आदेश दिले, एकूण मुंबईतील एकूण पदवीधराची लाखोतील संख्या पाहाता पदवीधर  वोटर लिस्ट मधे नाव नोंदणीकरण्यास  उत्सुक नाहीत. पण तिसरा ट्प्प्यात  किती रिस्पॅान्स मिळेल याबाबत राजकीय वर्तुळात शंका आहे.

"शासकीय स्तरावरून निवडणूक प्रशासनामार्फत जन जागृती मोहीम हाती घ्यावी.भरलेले फॅार्म घेण्यासाठी प्रत्येक सेंटरला वेगवेगळे नियम लावू नये.तसेच पदवीधरानी ११ ते५ या वेळेत येऊन स्वत:  फॅार्म भरणे अपेक्षित धरू नये.निवडणूक आयोगाने तिसऱ्या टप्यात तरी प्रसिद्धी माध्यम व सोशल मीडियां मधून या तिसऱ्या टप्यात जास्तीत जास्त पदवीधर मतदारांची नोंदणी होण्यासाठी निवडणूकींचा प्रचार व प्रसार करून जनजागृती करावी."
-डॉ. दीपक सावंत, माजी आरोग्य मंत्री

Web Title: All the parties rushed for graduate registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.