पालघर : राज्यपालांच्या अध्यादेशानुसार अनुसुचित जमातीक्षेत्रत लादलेले आरक्षण व पेसा कायद्यामुळे निर्माण झालेल्या दोन समाजामधील असंतोष यासंदर्भात नुकतीच राज्यपालासोबत बैठक झाली. यावेळी एका समाजावर अन्याय करणारा हा अध्यादेश असेल तर सर्वाना समान न्याय देण्यासाठी त्यातील अन्यायकारक कलमे दूर केली जातील, असा निर्वाळा राज्यपालांनी दिल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञानहितवर्धक मंडळाच्या शताब्दी महोत्सव सांगता समारंभाच्या वेळी दिली.
निसर्गाशी एकरूप असलेल्या व शेतीशी संलगA व्यवसायाद्वारे आपली गुजराण करणा:या समाजातील अनेक घटकांनी आपल्या संस्कृतीशी निगडीत जुन्या, नव्या घटकांचे दर्शन यावेळी शोभायात्रेमधून घडविले. कुणबी समाजाकडून उर्से येथे सूर्योदय शिक्षणसंस्थेचे विद्यालय शासनाच्या अनुदानाशिवाय मागील 15 वर्षापासून चालविले जात असून 9क् टक्के विद्यार्थी आदिवासी समाजाचे आहेत. त्यामुळे बहुजनाच्या प्रगतीचे ध्येय घेऊन वाटचाल करणा:या या कुणबी समाजाने एका नांगरामागे एक मण भात असे समीकरण जुळवून मंडळाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केल्याचे माजी अध्यक्ष राजाराम पाटील यांनी सांगितले. कुणबी समाज व आदिवासी समाज ही जीवनाच्या गाडीची दोन चाके असून अनेक वर्षापासून सुरू असलेले चांगले संबंध बिघडू नयेत याची काळजी आपण घेतली पाहीजे असे आदिवासी मंत्री सावरा यांनी सांगून राज्यपालांच्या अध्यादेशानुसार वाडा, शहापुर तालुक्यामध्ये बिगर आदिवासी व आदिवासी यांच्याबाबत असलेल्या आरक्षणातील त्रुटी दूर करण्याचा प्रय} केला जाईल असे त्यांनी सांगितले तर निवडणुकीच्या तोंडावर पेसा कायद्याच्या विरोधातील चुकीच्या राजकारणाचा फटका आपल्याला बसल्याचे सांगून सत्तेत नसले तरी समाजकारणाचे माझे कार्य अविरत सुरूच राहील असे राजेंद्र गावितांनी सांगितले. समाजाचा प्रत्येक माणूस मोठा होईल तेव्हाच समाजही आत्मनिर्भर होईल त्यासाठी व्यवसायाच्या बरोबर उच्च शिक्षणाकडेही समाजधुरीणींनी लक्ष द्यावे असे भारतकुमार राऊत यांनी शेवटी सांगितले.यावेळी व्यासपीठावर माजी खा. भारत कुमार राऊत, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आ. विलास तरे, नगराध्यक्षा प्रियंका पाटील, तहसिलदार चंद्रसेन पवार, संस्था अध्यक्ष मरतड पाटील इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाजातील सढळहस्ते मदत करणारे विनोद अधिकारी, ठाकुर कुटुंबीय, प्रशांत पाटील, विलास पाटील इ. मान्यवरांसह संतोष पावडे या राष्ट्रपती पदक विजेत्या शिक्षकाचा सत्कार करण्यात आला. यासोहळ्याला हजारो समाजबांधव आवजरून
व मोठय़ा उत्साहाने उपस्थित होते. (वार्ताहर)