पैशांवरून झालेल्या वादातून अपहरणाचा आराेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:07 AM2021-02-16T04:07:08+5:302021-02-16T04:07:08+5:30
कुरार पाेलिसांकडून चाैकशी सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डोमीसाइल सर्टिफिकेट बनवून घेण्यास नकार दिल्याने मालाडच्या आरटीओ एजंटचे अपहरण ...
कुरार पाेलिसांकडून चाैकशी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डोमीसाइल सर्टिफिकेट बनवून घेण्यास नकार दिल्याने मालाडच्या आरटीओ एजंटचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र पैशांच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार कुरार पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
कुरार पोलिसांनी शंकर गुप्ता नामक आरटीओ एजंटचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी प्रशांत परब तसेच रवींद्र दळवी या दोघांना अटक करण्यात आली आहे. परब हा बनावट डोमीसाइल सर्टिफिकेट बनवतो असा संशय आल्याने त्याच्याकडून ते बनवून घेण्यास गुप्ताने नकार दिल्याने त्याचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप गुप्ताने केला होता. मात्र कुरार पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली असता गुप्ता आणि परबमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद सुरू होते. गुप्ता परबचा देणेकरी होता आणि त्यातूनच हा सर्व प्रकार घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार पोलीस यातील तथ्य पडताळून पाहत आहेत. गुप्ता कुरारच्या दुर्गानगरमध्ये राहत असून गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास परबने त्याचे कारमधून अपहरण केले. त्यानंतर त्याला चौघांनी मारहाण केली आणि नंतर पुन्हा कुरारमध्ये आणून सोडले अशी तक्रार त्याने कुरार पोलिसांत दाखल केली आहे.
...............................