Join us

पार्थ समथानवर विनयभंगाचा आरोप

By admin | Published: April 24, 2017 2:44 AM

वादग्रस्त टीव्ही कलाकार पार्थ समथान याच्याविरूद्ध सोळा वर्षांच्या युवतीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी, बांगूरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

मुंबई : वादग्रस्त टीव्ही कलाकार पार्थ समथान याच्याविरूद्ध सोळा वर्षांच्या युवतीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी, बांगूरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपासून पार्थ हा लैंगिक चाळे करत असल्याची तक्रार पीडित युवतीने केली आहे.दरम्यान, याबाबत पार्थने अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याबाबत सोमवारी सुनावणी होणार आहे. टीव्हीवरील मालिकेमुळे चर्चेत राहिलेल्या पार्थविरोधात या युवतीने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. अर्जात आपण अल्पवयीन असल्यापासून पार्थ विविध बहाण्याने लैंगिक चाळे करत असल्याचे म्हटले आहे. विरोध केल्यास मारहाण करण्याची धमकी देत असल्याचेही नमूद आहे. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्यावर बालअत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉस्को) व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पार्थ समथान हा यापूर्वीही अशा तक्रारीबाबत चर्चेत राहिला होता. २०१३ मध्ये त्याने टीव्ही मालिका निर्माता विकास गुप्ता याच्याविरुद्ध तक्रार केली होती. विकासने मालिकेत काम मिळवून देण्यासाठी आपल्याशी अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असे, असा आरोप केला होता. (प्रतिनिधी)