३० वर्षांपासूनची युती संपली, की अद्याप ऐक्याची शक्यता?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 02:43 AM2019-11-09T02:43:52+5:302019-11-09T02:46:27+5:30

राज्यात सत्तापेच कायम : मोठा भाऊ-छोटा भाऊ नात्याचे काय?

The alliance for 3 years is over, or the possibility of unity? | ३० वर्षांपासूनची युती संपली, की अद्याप ऐक्याची शक्यता?

३० वर्षांपासूनची युती संपली, की अद्याप ऐक्याची शक्यता?

Next

मुंबई : शिवसेना व भाजपची युती १९८९ सालपासूनची. म्हणजे ३0 वर्र्षापासूनची. युतीमुळेच शिवसेनेचे मनोहर जोशी १९५ साली मुख्यमंत्री झाले. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचेच नारायण राणे यांनाही काही महिने ते पद भूषवता आले. त्यावेळी शिवसेना मोठ्या व भाजप लहान भावाच्या भूमिकेत असल्याने गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले.

पण २0१४ साली युती झाली नाही आणि दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुका लढले. तरीही भाजपचे सर्वाधिक आमदार असल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. भाजप मोठा तर शिवसेना लहान भाऊ बनला. पण मोठ्या भावाला स्पष्ट बहुमत नव्हते आणि शिवसेना सत्तेत जाण्यास तयार नव्हती. अशा वेळी पुन्हा निवडणुका नकोत व राज्यात स्थैर्य असावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे हा भाजपपुढील पेचच होता. त्यामुळे तो न घेता मनधरणी करून भाजपने शिवसेनेला सरकारमध्ये घेतले. पण लहान भावाला उपमुख्यमंत्रिपद मात्र मिळाले नाही.

यंदा दोन्ही पक्ष एकत्र येऊ न लढले. युतीला बहुमतही मिळाले. तरीही मुख्यमंत्रिपद आम्हाला हवे, या मुद्यावरून शिवसेना अडून बसल्याने राज्यात युतीचे सरकार केल्या १५ दिवसांत बनूच शकलेले नाही. राज्यात राजकीय पेच वाढला आहे. त्यामुळे युतीच संपुष्टात येते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. या युतीला १९९५ व यंदा अशा दोनदाच बहुमत मिळाले. एकदा सरकार आले, दुसऱ्यांदा आता बनू शकले नाही. पण १९९0, १९९९ तसेच २00५, २00९ मध्ये युती असूनही बहुमत मिळाले नव्हते. युती संपुष्टात येण्याची शक्यता याआधीही अनेकदा निर्माण झाली होती. काही वेळा मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुकांत हे दोन्ही पक्ष संयुक्तपणे तर काही वेळा वेगवेगळे लढले होते. तेव्हाही युती तुटणार की काय, अशी चर्चा व्हायची. पण निवडणुकांनंतर ते बहुधा एकत्र यायचे. यावेळी मात्र राज्याची सत्ता मिळण्याची शक्यता असूनही ती तसे घडले नाही.

 बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असेपर्यंत युतीमध्ये त्यांचा शब्द अखेरचा असायचा. भाजपचे नेते प्रमोद महाजन व बाळासाहेब यांच्यात चर्चा होऊ न निर्णय घेतला जायचा. पण प्रमोद महाजन यांचे २00६ साली, तर बाळासाहेब ठाकरे यांचे २0१२ मध्ये निधन झाल्यानंतर चित्र बदलत गेले. नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे हे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू लागले. पण दोन्ही पक्षांत सतत तणाव दिसायचा. ठाकरे यांच्या निधनानंतर दोनच वर्षांनी, २0१४ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा काँग्रेसची अवस्था वाईट होती आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप अतिशय आक्रमक झाला होता. त्या निवडणुका जिंकताच भाजप आपोआप राज्यात मोठा भाऊ झाला. पण लहान भावाची भूमिका स्वीकारायला शिवसेना तयार नव्हती. म्हणजेच आता जी परिस्थिती पाहायला मिळाली, तीच तेव्हाही पहायला मिळाली. आता मात्र संबंध इतके ताणले गेले आहेत की युती खरोखरच संपली की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र ही युती मुळात झाली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. तो मुद्दा दोन्ही पक्ष आक्रमकपणे मांडतात. तरीही युती तुटायच्या मार्गापर्यंत येऊ न पोहोचली. त्यामुळे हिंदुत्व हा दोघांना जोडणारा मुद्दा राहिलेला नाही, असेच दिसत आहे. राज्यात युती नसल्याने केंद्रातील सत्तेतून शिवसेनेचे अरविंद सावंत बाहेर पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसे घडले, तरच युती तुटली, असे म्हणता येईल.


मुंबई महापौरपद निवडणुकीवर परिणाम
मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तिथे शिवसेनेचे सुमारे ९0 व भाजपचे ८४ सदस्य आहेत. आतापर्यंत तिथे दोघे एकत्र येत आणि शिवसेनेचा महापौर व भाजपचा उपमहापौर होत असे. आता तिथे सेनेला भाजप मदत करणार की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साह्याने शिवसेनेचा महापौर होणार, हेही महत्त्वाचे ठरते. केंद्रातील सत्ताधारी आघाडीतून शिवसेना बाहेर पडली तरच आम्ही मदत करू, असे काँग्रेसने जाहीर केले असल्याने शिवसेना आता राज्याच्या राजकारणात नेमकी कोणाबरोबर असणार, याकडे सर्वांचे लक्ष असणे स्वाभाविक आहे.

Web Title: The alliance for 3 years is over, or the possibility of unity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.