Join us

वर्सोवा खाडीत, युती-काँग्रेस आघाडी व सपात तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 2:40 AM

२०१४ पर्यंत हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.

मनोहर कुंभेजकरउत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे २००९ साली वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ असे विभाजन झाले. मालाड क्रीक ब्रिजपासून ते वर्सोवा खाडीपर्यंत पसरलेला हा मतदारसंघ आहे. राज्यातील मोठे मासेमारी केंद्र आणि स्वातंत्र्य लढ्यात वेसावे कोळीवाड्यातील ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेतला होता, असे महत्त्व या मतदारसंघाला आहे. एका बाजूला जोगेश्वरी पश्चिमेकडील संमिश्र प्रांतातून स्थायिक झालेली कष्टकऱ्यांची चाळ वस्ती, मध्यभागी असलेला लोखंडवाला, यारी रोड सारखा श्रीमंत उद्योजक, सिनेसृष्टीतील धनिकांची वास्तव्ये आणि टोकाला असलेला कोळी समाज असा त्रिवेणी संगम असलेला हा बहुभाषिक मतदारसंघ आहे.

२०१४ पर्यंत हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीत सुरुंग लावला. महायुतीचे कीर्तिकर यांना ५८,३५४, कामत यांना ४७,९६९, आपच्या मयांग गांधी यांना ११,२६०, तर मनसेच्या महेश मांजरेकर यांना ४,४२० मते मिळाली होती.विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विद्यमान आमदार डॉ. भारती लव्हेकर निवडून आल्या. शिवसेनेच्या उमेदवार राजुल पटेल या निवडणूक अर्जाची वेळ निघून गेल्यावर त्यांचा निवडणूक अर्ज सादर करण्यासाठी आल्या, या कारणास्तव त्यांचा निवडणूक अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने रद्द केला.

वर्सोवा विधासभेचा विचार करता, २०१४च्या निवडणुकीत डॉ. लव्हेकर यांना एकूण १,१७,२६८ वैध मतांपैकी ४२ टक्के मते (४९,१८२) मिळाली, तर काँग्रेसचे माजी आमदार बलदेव खोसा यांना केवळ २० टक्के (२२,७८४) मते मिळाली, तर येथून प्रथमच लढणाºया एमआयएमला २०,१२७ मते मिळाली होती, तर मनसेला मते १४,५०८ पर्यंत मिळालेली होती.वर्सोवा विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार २,७१,१८४ असून पुरुष मतदार १,४९,८०६, तर महिला मतदारांची संख्या १,२०,६८३ इतकी आहे. यामध्ये जातीनिहाय मराठी ५६,२००, उत्तर भारतीय ६१,५००, अल्पसंख्याक १,०१,१००, गुजराथी/राजस्थानी २५,४००, दक्षिण भारतीय १३,४००, ख्रिश्चन ४,७०० इतर ९००० अशी मतदारांची संख्या आहे.राजकीय घडामोडीच्काँग्रेस व सपा यांच्या मतविभाजची शक्यता असून, येथील अल्पसंख्याक १,०१,१०० मते निर्णायक ठरू शकतात.च्कामत गट व संजय निरुपम यांचे हाडवैर होते. त्यामुळे कामत गट निरुपम यांच्या प्रचारात कितपत उतरतो हा प्रश्न आहे.च्येथील जातीनिहाय मतदार संघातील आकडेवारीच्या आधारावर आगामी लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीतजास्त मते स्वत: कडे खेचण्यासाठीची रणनीती शिवसेना व काँग्रेस आणि समाजवादी पार्टी प्रयत्नशील आहे.दृष्टिक्षेपात राजकारणभाजपच्या स्थानिक आमदार डॉ.भारती लव्हेकर आणि त्यांचे नगरसेवक आणि कार्यकर्ते हे एकदिलाने कीर्तिकर यांच्या प्रचारात उतरल्याचे चित्र आहे.काँग्रेसचे उमेदवार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे निवासस्थान स्वामी समर्थ मंदिर जंक्शननजिक शास्त्रीनगर येथे आहे. २०१४ची लोकसभा निवडणूक निरुपम यांनी यांनी उत्तर मुंबईतून लढविली होती. गेली २५ ते ३० वर्षे ते या मतदार संघाचे रहिवासी असून, येथून निवडणूक लढविण्याचे त्यांचे स्वप्न काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पूर्ण केले. त्यामुळे निरुपम यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची आणि त्यांचे पुढील राजकीय भवितव्य ठरवणारी ही महत्त्वाची निवडणूक आहे.