Join us

ईदच्या नमाजासाठी ५० जणांना परवानगी द्या : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:06 AM

मुंबई : बकरी ईदनिमित्त ५० जणांना मस्जिदमध्ये नमाज पठणाची परवानगी देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली ...

मुंबई : बकरी ईदनिमित्त ५० जणांना मस्जिदमध्ये नमाज पठणाची परवानगी देण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री नवाब मलिक यांना पत्र पाठविणार असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे.

बकरी ईदला मुस्लीम समाजास मास्क आणि फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून ५० जणांना मस्जिदमध्ये नमाज पठणाच्या परवानगीसह विविध मागण्यांसाठी मौलाना अब्दूर रशीद अन्सारी, मौलाना अमानुल्लाह खान, मोहम्मद कलीम शेख, मुस्तफा अन्सारी यांच्या शिष्टमंडळाने आठवले यांची भेट घेतली. बकरी ईद साठी ऑनलाइन खरेदीऐवजी बाजारात बकरी विक्री सुरू करावी, कुर्बानीसाठी देवनार येथील पशुवधगृहात परवानगी द्यावी, प्रतीकात्मक कुर्बानी इस्लाममध्ये मान्य नसून या पद्धतीचा नियम राज्य सरकारने मुस्लीमांवर लादू नये, अशी मागणी शिष्टमंडळाने रामदास आठवले यांना निवेदन देऊन केली आहे. मुस्लीम बांधवांच्या या मागण्यांसाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांना पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी अन्सारी यांना दिले.