रेस्टॉरंटमध्ये डाईन इन रात्री ११ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:16+5:302021-06-09T04:08:16+5:30
मुंबई : वेळेच्या निर्बंधांमुळे रेस्टॉरंटच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने रेस्टॉरंटमध्ये डाईन इन रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्या, ...
मुंबई : वेळेच्या निर्बंधांमुळे रेस्टॉरंटच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने रेस्टॉरंटमध्ये डाईन इन रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्या, अशी मागणी हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सायंकाळी ४ वाजेपर्यंतच ही परवानगी देण्यात आल्यामुळे, पहिल्याच दिवशी केवळ १८ टक्के रेस्टॉरंट खुले ठेवण्यात आले होते. रेस्टॉरंटचा ८० टक्के व्यवसाय हा सायंकाळनंतरच होतो. त्यामुळे रेस्टॉरंट संध्याकाळीदेखील सुरू राहणे गरजेचे आहे. सध्या जी वेळेची बंधने घालण्यात आली आहेत, त्यामुळे रेस्टॉरंट व्यावसायिकांचा खर्च जास्त व उत्पन्न कमी, अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे रेस्टॉरंट व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे सरकारने रेस्टॉरंट ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, त्याचप्रमाणे रेस्टॉरंटकडे असणाऱ्या मोकळ्या जागेत आणि टेरेसवरदेखील आसनक्षमता वाढविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.