बँकेच्या प्रत्येक घटकाला लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:07 AM2021-04-23T04:07:24+5:302021-04-23T04:07:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी दिवसागणिक राज्यात कठोर निर्बंध लावले जात आहेत. याअंतर्गत मुंबईच्या लोकलमधून केवळ ...

Allow every component of the bank to travel by local! | बँकेच्या प्रत्येक घटकाला लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्या!

बँकेच्या प्रत्येक घटकाला लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी दिवसागणिक राज्यात कठोर निर्बंध लावले जात आहेत. याअंतर्गत मुंबईच्या लोकलमधून केवळ अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी आहे. यामध्ये बँकेत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला सामावून घ्यावे आणि त्यांना लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी बँक कर्मचाऱ्यांकडून जोर धरत आहे.

बँकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये या मुद्यावरून गोंधळ निर्माण झाला होता. आतासुद्धा लोकलमधून प्रवास करण्यासाठी बँकेत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना अडचण येत आहे. लोकलमधून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी आहे. यात राज्य आणि केंद्राचे कर्मचारी येतात. बँकेबाबत बोलायचे झाल्यास, राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही लोकलमधून प्रवास करता येतो. मात्र, खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांसह सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना अडचण येते. पतपेढीही एक बँक आहे. त्यांना लोकलमधून प्रवास करताना अडचणी येतात. त्यामुळे सरकारने याबाबतचे निर्देश जारी करताना बँकेच्या प्रत्येक घटकाला लोकलमधून प्रवासाची परवानगी द्यावी, जेणेकरून सदर कर्मचाऱ्यांना त्याच्या ग्राहकांना वेळेत सेवा देता येईल; या प्रमुख मुद्यावर जोर दिला जात आहे.

..............................

Web Title: Allow every component of the bank to travel by local!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.