हिंदू सण जल्लोषात साजरे करण्याची परवानगी द्या; भाजपाची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 07:23 PM2022-03-29T19:23:10+5:302022-03-29T19:23:30+5:30

प्रार्थना स्थळांमधून लाऊडस्पीकरवरील अजानच्या आवाजाबाबत मुंबईकर नाराज असल्याचा भाजपाचा आरोप

Allow Hindu festivals to be celebrated in Jallosh; BJP's demand to Mumbai Police Commissioner | हिंदू सण जल्लोषात साजरे करण्याची परवानगी द्या; भाजपाची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी

हिंदू सण जल्लोषात साजरे करण्याची परवानगी द्या; भाजपाची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी

googlenewsNext

मुंबई : हिंदू नववर्षाच्‍या निमित्ताने गुढीपाडव्‍याला निघणा-या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणुका काढण्यास तसेच हिंदू सण जल्लोषात साजरे करण्यास परवानगी द्या, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त  संजय पांडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. 

मुंबई पोलीस प्रशासन यंत्रणेकडून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ध्वनी प्रदूषणाच्या विविध कारणांचा मुंबईकर आपल्या दैनंदिन आयुष्यात सामना करत असतात. त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रार्थना स्थळांमधून लाऊडस्पीकरवरून केली जाणारी अजान आहे. कोणीही अजानच्या विरोधात नसून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून मोठ्या आवाजात अजान दिल्यामुळे ध्वनिप्रदूषण होत असून मुंबईकरांचा याला विरोध आहे. मुंबईकरांच्या भावना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या पर्यंत पोहोचाव्यात यासाठी मुंबई भाजपा शिष्टमंडळानं पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि हिंदू सण जल्लोषात साजरे करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे निवेदन सुपूर्द केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २ एप्रिल २०२२ रोजी हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडवाच्या दिवशी सालाबादप्रमाणे मुंबईत ठिकठिकाणी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी मुंबईत जल्लोषात सुरु आहे. या यात्रेला परवानगी द्यावी, त्याचबरोबर १० एप्रिल २०२२ रोजी रामनवमी, १४ एप्रिल २०२२ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती हे सण साजरे करण्यासाठी संपूर्ण हिंदू समाज उत्सुक असून या कार्यक्रमांना परवानगी द्यावी.

या भेटीदरम्यान मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार  राहुल नार्वेकर, आचार्य पवन त्रिपाठी, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाअध्यक्ष  राजेश शिरवडकर, मुंबई भाजपा उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष जयप्रकाश सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Allow Hindu festivals to be celebrated in Jallosh; BJP's demand to Mumbai Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा