मुंबई : मुंबईत व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेकडून मिळणा-या विविध परवान्यांसाठी आवश्यक प्रक्रिया आॅनलाइन करण्यात आली आहे. या आॅनलाइन एक खिडकी पद्धतीअंतर्गत महापालिकेच्या संकेतस्थळावर व्यवसाय परवान्यासाठी अर्ज करणे, शुल्क भरणे ते परवाना मिळवणे, मुंबईकरांना घरबसल्या शक्य होणार आहे. ३१ आॅक्टोबरपासून आॅनलाइन एक खिडकी पद्धत सुरू होणार आहे.मुंबईत व्यवसाय सुरू करताना महापालिकेच्या संबंधित खात्याद्वारे परवाना घ्यावा लागतो. यामध्ये अनुज्ञापन खात्याद्वारे दिला जाणारा व्यापार परवाना, दुकाने व आस्थापना खाते, सार्वजनिक आरोग्य खाते आणि इमारत व कारखाने खात्याद्वारे दिल्या जाणाºया कारखाना विषयक परवानग्यांचा समावेश आहे. आपल्या दुकानाचा किंवा व्यवसायाचा फलक निआॅन साइन पद्धतीचा करण्याची परवानगीही महापालिकेकडून घ्यावी लागते. व्यवसायाच्या प्रकारानुसार यापैकी एक किंवा अधिक परवानग्या महापालिकेकडून घ्याव्या लागतात व यासाठी संबंधित अर्जदाराला त्या-त्या खात्याकडे अर्ज करावा लागतो.व्यवसाय विषयक परवानगी देणारी महापालिकेची ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे अर्जदारास त्या-त्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागतो. यात बराच वेळ वाया जातो. महापालिकेने आता या परवानग्यांसाठी आॅनलाइन एक खिडकी पद्धत सुरू केली आहे. यामुळे घरबसल्या सर्व परवानगी मिळणार असून, अर्जदाराची पायपीट थांबणार आहे. दरम्यान, दुकाने व आस्थापना खात्याशी संबंधित परवानग्या, तर सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात येणाºया उपाहारगृह विषयक परवानग्यांची प्रक्रिया यापूर्वीच आॅनलाइन करण्यात आली आहे.अशी मिळेल परवानगीबृहन्मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावरील आॅनलाइन सर्व्हिसेस या लिंक अंतर्गत न्यू बिझनेस अॅप्लिकेशन या लिंकअंतर्गत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची सुविधादेखील यात उपलब्ध आहे. ज्यामुळे अर्जदाराचा छायाप्रती काढण्याचा वेळ व खर्च वाचणार आहे.वेळेची बचतआॅनलाइन एक खिडकी पद्धतीअंतर्गत अर्ज केल्यानंतर त्या अर्जावर संबंधित खात्याद्वारे केली जाणारी प्रक्रियादेखील आॅनलाइन पद्धतीनेच होणार आहे. यामुळे फाइल मुव्हमेंट कालावधीदेखील मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. यासोबतच महापालिकेकडे शुल्कदेखील आॅनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा आहे. महापालिकेच्या स्तरावरील आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित परवानादेखील आॅनलाइन पद्धतीनेच मिळणार आहे. विशेष म्हणजे, प्रक्रियेच्या टप्प्यानुसारची माहिती अर्जदारास ईमेल व एसएमएसही पाठविले जाणार आहेत.
घरबसल्या व्यवसायाची परवानगी, आॅनलाइन एक खिडकी पद्धत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 6:45 AM