‘जगन्नाथ यात्रेच्या धर्तीवर जुम्माची नमाज एकत्र पढण्याला परवानगी द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:05 AM2020-06-25T05:05:28+5:302020-06-25T05:05:33+5:30

राज्य सरकारने मुस्लीम बांधवांना शुक्रवारी मशिदीत नमाज पठण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रझा अकादमीने केली.

‘Allow Jumma Namaz to be recited together on the lines of Jagannath Yatra’ | ‘जगन्नाथ यात्रेच्या धर्तीवर जुम्माची नमाज एकत्र पढण्याला परवानगी द्या’

‘जगन्नाथ यात्रेच्या धर्तीवर जुम्माची नमाज एकत्र पढण्याला परवानगी द्या’

Next

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथ यात्रेबाबत दिलेल्या निकालाच्या धर्तीवर राज्य सरकारने मुस्लीम बांधवांना शुक्रवारी मशिदीत नमाज पठण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रझा अकादमीने केली. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
पुरी जगन्नाथ यात्रेचे धार्मिक महत्त्व ओळखून सर्वोच्च न्यायालयाने पुरी येथे ५०० भाविकांना विधी करण्यास परवानगी दिली. त्याच धर्तीवर मुस्लिमांना नमाज पडण्याची अनुमती देण्याबाबत रझा अकादमीचे सरचिटणीस सईद नुरी यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक मुस्लीम धर्म अभ्यासक आणि धार्मिक गुरूंनी अकादमीचे या बाबीकडे लक्ष वेधले. इस्लाम धर्मात शुक्रवारी होणाऱ्या ‘जुम्मा’ची नमाज एकत्रित पडण्याला असाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सरकारने या दिवशी नमाज पडण्यास परवानगी द्यावी, त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, अन्य सर्व नियम व अटींना अधीन राहून त्याची पूर्तता केली जाईल, ज्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका राहणार नाही.

Web Title: ‘Allow Jumma Namaz to be recited together on the lines of Jagannath Yatra’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.