Join us

अत्यावश्यक कारणासाठी खासगी वाहनांना प्रवासाला मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:06 AM

- संजय पांडेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी आंतरजिल्हा प्रवासासाठी ...

- संजय पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी आंतरजिल्हा प्रवासासाठी खासगी वाहनाचा वापर करता येणार आहे. त्यासाठी कसल्याही पासची आवश्यकता असणार नाही. ते आवश्यक ठिकाणी प्रवास करू शकतील. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. त्यासाठी काही अडचणी आल्यास स्थानिक पोलीस आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

बुधवार रात्रीपासून लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे स्पष्ट करून पांडे म्हणाले, संचारबंदीच्या या काळात दोन लाखांवर पोलीस दोन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या मदतीला सुमारे १४ हजार होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या २० तुकडी तैनात करण्यात आल्या आहेत.

टाळेबंदीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, काेराेना रुग्णांना साहाय्य करण्यासाठी पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कारणास्तव नागरिकांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर करता येईल, त्यासाठी कसल्याही पासची आवश्यकता असणार नाही.