लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : मुंबई सध्या अनलॉक लेव्हल २ च्या नियमांत बसत असताना लेव्हल ३ नुसार निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ८० टक्के रेस्टॉरंटचा व्यवसाय हा सायंकाळी आणि शनिवार, रविवारी होतो. सध्या सोमवार ते शुक्रवार ४ पर्यंत सुरू आहे, त्याचा मोठा फटका बसत आहे. बार आणि रेस्टॉरंट ११ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असे हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे शेरी भाटिया म्हणाले.
आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, मुंबईत लेव्हल २ ची स्थिती असताना महापालिकेने लेव्हल ३ नुसार निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. रेस्टॉरंट आणि बार पुढील लेव्हलनुसार निर्बंध शिथिल होईल, अशी व्यावसायिकांची अपेक्षा आहे; पण प्रशासनाचे असे निर्णय येत आहेत. हॉटेल रेस्टॉरंट क्षेत्राला कर्ज आणि नुकसानाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे ५० टक्के क्षमतेसह सुरू करू द्यावे, पालिकेला विनंती आहे.