दूध विक्रीस सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत परवानगी द्या- संजय निरुपम यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:07 AM2021-05-08T04:07:01+5:302021-05-08T04:07:01+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या वतीने कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला असून, निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यातील सर्व किराणा, ...

Allow sale of milk from 4 pm to 7 pm - Demand of Sanjay Nirupam | दूध विक्रीस सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत परवानगी द्या- संजय निरुपम यांची मागणी

दूध विक्रीस सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत परवानगी द्या- संजय निरुपम यांची मागणी

Next

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या वतीने कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला असून, निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, खाद्य दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू राहण्याबाबत नियम करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे दूध व्यवसायासाठीदेखील सकाळी 7 ते 11 ही वेळ ठरविण्यात आली आहे. मात्र, संध्याकाळचे दूध वाया जाते आणि याचा मोठा फटका दूध व्यावसायिकांना बसत असून, सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत दूध विकण्यास परवानगी द्यावी, असे निरुपम यांनी निवेदनात नमूद केले आहे.

-------------------- -- -- --

Web Title: Allow sale of milk from 4 pm to 7 pm - Demand of Sanjay Nirupam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.