कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या वतीने कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला असून, निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, खाद्य दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू राहण्याबाबत नियम करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे दूध व्यवसायासाठीदेखील सकाळी 7 ते 11 ही वेळ ठरविण्यात आली आहे. मात्र, संध्याकाळचे दूध वाया जाते आणि याचा मोठा फटका दूध व्यावसायिकांना बसत असून, सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत दूध विकण्यास परवानगी द्यावी, असे निरुपम यांनी निवेदनात नमूद केले आहे.
-------------------- -- -- --